ED Raids : दिल्लीपासून बिहारपर्यंत...लालू यादवांशी संबंधित १५ ठिकाणांवर ED चे छापे, तेजस्वीसह नातेवाइकही रडारवर

ED Raids On Lalu Prasad Yadav Locations : माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याभोवतीचा केंद्रीय तपास यंत्रणांचा फास आणखी घट्ट होत चालला आहे.
ED Raids On Lalu Prasad Yadav Locations
ED Raids On Lalu Prasad Yadav LocationsSAAM TV
Published On

ED Raids On Lalu Prasad Yadav Locations : माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याभोवतीचा केंद्रीय तपास यंत्रणांचा फास आणखी घट्ट होत चालला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) शुक्रवारी जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.

ईडीने दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशातील जवळपास १५ ठिकाणांवर छापे मारले. हे छापे लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणी मारले आहेत. याआधी सीबीआयने या प्रकरणात लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि राबडीदेवी यांचीही चौकशी केली होती. (Latest News)

ED Raids On Lalu Prasad Yadav Locations
Ratnagiri News: रामदास कदमांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; साई रिसॉर्टप्रकरणी मोठी कारवाई

ईडीचे छापे कुठे?

ईडीने दिल्लीत फ्रेंड्स कॉलनीत तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानीही छापा मारला आहे.

पाटण्यात राजदचे माजी आमदार अबु दोजाना यांच्या घरावरही धाड टाकली आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, लालूप्रसाद यादव यांची कन्या मीसा यांच्याशी संबंधित ठिकाणांवरही झडती घेण्यासाठी ईडीचे पथक पोहोचले आहे.

लालू यादव यांचे नातेवाइक जितेंद्र यादव यांच्या गाझियाबादस्थित घरीही ईडीने धाड टाकली आहे.

दोजाना यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सीए आरएस नाइक यांच्याशी संबंधित रांचीमधील ठिकाणांवरही धाडी टाकल्या आहेत.

ED Raids On Lalu Prasad Yadav Locations
Sanjay Raut News: त्यांच्या वाटेला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही...; राज ठाकरेंच्या गर्जनेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

ईडीच्या धाडीवर राजदकडून प्रतिक्रिया

ईडीच्या कारवाईनंतर राजदचे प्रवक्ता मृत्युंजय तिवारी म्हणाले की, भाजपचा लोकशाहीवर विश्वास नाही. राजकीय सूडभावनेतून केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाया केल्या जात आहेत. भाजपचा २०२४ मध्ये सुपडासाफ होईल. भविष्यात भाजप जेव्हा विरोधी बाकावर बसेल त्यावेळी ईडी आणि सीबीआय त्यांच्याही ठिकाणांवर पोहोचेल.

लालूप्रसाद आणि राबडीदेवी यांचीही झाली होती चौकशी

सीबीआयने सोमवारी पाटणा येथे राबडी देवी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची चौकशी केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशीच सीबीआयचे पथक दिल्लीत मीसा भारती यांच्या घरी पोहोचले होते. सीबीआयने लालूप्रसाद यादव यांचीही कैक तास चौकशी केली होती. लालूप्रसाद यादव हे दिल्लीत मीसाच्या घरी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com