Sadanand Kadam
Sadanand KadamSaam TV

Ratnagiri News: रामदास कदमांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; साई रिसॉर्टप्रकरणी मोठी कारवाई

ED Action : दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.

जितेश कोळी

रत्नागिरी : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे लहान भाऊ उद्योजक सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. खेडमधील कुडोशी येथील त्यांच्या अनिकेत फार्म हाऊस या निवासस्थानातून सदानंद कदम यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.

दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे.

Sadanand Kadam
Sangli News: शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी सांगावी लागतेय जात; सांगलीतील प्रकारामुळे शेतकरी संतप्त

दापोली, मुरुड येथील साई रिसॉर्टची मालकी सध्या सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान बंधू आहेत. (Latest News)

साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी ईडीने आज सदानंद कदमांना अटक केली आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी अब तेरा क्या होगा अनिल परब, असा सवाल विचारला आहे. त्यामुळे आता अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होत का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Sadanand Kadam
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, अवजड ट्रक पुलावरुन थेट खाली कोसळला

सदानंद कदम यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप माजी आमदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com