Earthquake in Tripura: मोठी बातमी! मोरोक्कोनंतर त्रिपुरा भूकंपाने हादरलं; ४.४ रिश्टर स्केलची नोंद

Earthquake in Tripura: त्रिपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. त्रिपुरा पुन्हा एकदा भूकंपाने हादरलं आहे.
Earthquake in Delhi
Earthquake in DelhiSaam Tv

Earthquake News:

त्रिपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. त्रिपुरा पुन्हा एकदा भूकंपाने हादरलं आहे. शनिवारी दुपारी ३.४८ वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला आहे. त्रिपुरात ४.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली आहे. 'एनआयए'ने याबाबत वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपुरात ४.४ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्रिपुरातील धर्मनगरच्या ७२ किमी उत्तर पूर्व येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या आधी देखील त्रिपुरात भूकंप झाला होता. त्यावेळी त्रिपुरात ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरात भूकंपाचे धक्के शनिवारी दुपारी ३.४८ वाजण्याच्या सुमारास जाणवले. आतपार्यंत या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

मोरोक्को भूकंपाने हादरलं

मोरोक्को देश भूकंपाने हादरला आहे. मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री भूकंप झाला आहे. मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपाने संपूर्ण मोरोक्को देश हादरला आहे.

Earthquake in Delhi
Mumbai Accident News: मुंबई- अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; विरारमधील तरुणाचा मृत्यू, २ गंभीर जखमी

या भूकंपात शेकडो घरे कोसळली आहेत. या भूकंपात आतापर्यंत २९६ जण मृत्यूमुखी पावल्याची माहिती आहे. तर १५३ जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमी नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

१२० वर्षातील सर्वात मोठा भूकंप असल्याचे बोलले जात आहे. या भूकंपाचा केंद्र बिंदू हा मराकेश शहरापासून ७१ किमी किमी दक्षिण-पश्चिमेस १८.५ किमी खोलीवर होता. या भूकंपामुळे नागरिकांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com