Mini-Moon: पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र! लवकरच दिसणार 'मिनी-मून', खगोल अभ्यासकांसाठी दुर्मीळ संधी

Earth to get second mini-moon: पृथ्वीला नवा चंद्र मिळणार आहे. आश्चर्य वाटलं ना...हे खरं आहे. हा चंद्र दोन महिने पृथ्वीभोवती फिरणार आहे. गुरुत्वाकर्षणाच्या जादूमुळे हा चमत्कार घडणार आहे.
पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र! लवकरच दिसणार 'मिनी-मून', खगोल अभ्यासकांसाठी दुर्मीळ संधी
Mini-MoonSaam Tv
Published On

अनादीकाळापासून मानवजातीला चंद्राचं आकर्षण आहे. सूर्यमालेच्या आणि चंद्राच्या जन्माविषयी गेली अनेक वर्षं शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. चंद्राचा जन्म ४.५१ अब्ज वर्षांपूर्वी झाला असावा, असं एक ठोस संशोधनही नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. पृथ्वीसोबत गुरु, शुक्र, शनी आदी अनेक ग्रह आहेत. यांच्याभोवती परिभ्रमण करणारे चंद्रही आहे.

एकट्या शनीभोवती तर १४६ चंद्र आहेत. पृथ्वीभोवती मात्र एकच चंद्र आहे. मात्र एका खगोलीय घटनेमुळे पृथ्वीला दोन महिन्यांसाठी का असेना आणखी एक मिनी चंद्र लाभणार आहे. अमेरिकन अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र! लवकरच दिसणार 'मिनी-मून', खगोल अभ्यासकांसाठी दुर्मीळ संधी
Karnataka News: कर्नाटक सरकारकडून गणपती बाप्पाला अटक? पूजनाला सरकारचा विरोध? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

'2024 PT5' हा पृथ्वीच्या जवळच्या लघुग्रहांपैकी एक आहे. ज्यांच्या कक्षा पृथ्वीच्या सारख्याच आहेत. त्याच्या संथ गतीमुळे आणि पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे, गुरुत्वाकर्षण शक्ती त्याची दिशा तात्पुरती बदलेल, ज्यामुळे तो एक छोटा चंद्र बनतो.

या लघुग्रहाचे सर्वात पहिल्यांदा दर्शन 7 ऑगस्ट 2024 रोजी झाले होते. याचा व्यास 10 मीटर इतका आहे. डोळ्यांनी किवा टेलिस्कोपने पाहिले तरी मिनीमून तितका स्पष्टपणे दिसू शकणार नाही. ही घटना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पाहायला मिळणार आहे. 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर या काळात हा लघुग्रह दिसेल.

पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र! लवकरच दिसणार 'मिनी-मून', खगोल अभ्यासकांसाठी दुर्मीळ संधी
Karnataka News: कर्नाटक सरकारकडून गणपती बाप्पाला अटक? पूजनाला सरकारचा विरोध? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

हा लघुग्रह 25 नोव्हेंबरनंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावापासून मुक्त होऊन सूर्याच्या कक्षेत परत येईल. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की पृथ्वीला तात्पुरता छोटा चंद्र मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याचे उदाहरण 2022 NX1 आहे. जो 1981 आणि 2022 मध्ये एक छोटा चंद्र होता. काही का असेना चंद्राचे गोडवे गाणाऱ्या कवींसाठी आणि खगोलप्रेमींना अभ्यासासाठी काही दिवसांसाठी येणारा हा पाहुणा महत्वाचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com