
Trump Tariffs Impact on India : अमेरिकेने भारतातून होणाऱ्या रत्न व दागिन्यांच्या निर्यातीवर लावलेली आयात टॅरिफ मोठ्या आर्थिक धक्क्याचं कारण ठरली आहे. २७ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणाऱ्या या नव्या निर्णयानुसार कट आणि पॉलिश केलेले हिरे, प्रयोगशाळेत तयार झालेले हिरे, सोने, चांदी, प्लॅटिनम आणि बनावट दागिने यांसह विविध दागदागिने वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारले जाणार आहे. यापूर्वी या वस्तूंवर वस्तूनिहाय ० ते १३.५ टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जात होते, ज्यात १ ऑगस्ट २०२५ पासून वाढ करून २५ टक्क्यांपर्यंत दर लावण्यात आले आणि आता ते थेट ५० टक्क्यांवर नेण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कॉलिन शहा म्हणाले, “या परिस्थितीमुळे रोजगारावर मोठा परिणाम होणार असून पुढील ४–५ महिन्यांत अंदाजे १.२५ लाख नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. यामुळे मुंबई आणि सूरत येथील डायमंड कटींग व ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करणारे कामगार सर्वात जास्त प्रभावित होतील.
भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार करार करण्यावर चर्चा सुरू असून येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत करार पूर्ण होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत हे दंडात्मक टॅरिफ भारतीय रत्न व दागिने क्षेत्रासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. याचा परिणाम केवळ निर्यातीवरच नव्हे तर रोजगार व भारताच्या जागतिक स्पर्धाशक्तीवरही होणार आहे.
शहा पुढे म्हणाले, “केंद्र सरकारने दीर्घकालापासून प्रलंबित असलेल्या विशेष आर्थिक क्षेत्र सुधारणा लवकरात लवकर अमलात आणाव्यात, आणि आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्सला चालना देण्यासाठी ठोस आणि सक्रिय उपाययोजना कराव्यात.” कारण सध्याच्या परिस्थितीत बाजार विविधीकरण अत्यावश्यक ठरत आहे. यासोबतच, विशेषतः ब्रिक्ससारख्या विकसनशील बाजारांशी मुक्त व्यापार करार करण्याचीही तीव्र गरज आहे. मेक इन इंडिया' या ब्रँडला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने भरीव आर्थिक तरतूद करावी, जेणेकरून उद्भवलेली आर्थिक अनिश्चितता दूर करण्यात उद्योग क्षेत्राला मदत होईल."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.