Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला आणखी एक मोठा झटका, टॅरिफनंतर ६ कंपन्यांवर घातली बंदी

Indian Company Banned By America: अमेरिकेने भारतावर २५ टक्के टेरिफ लादला. त्यामुळे भारताला मोठा धक्का बसलाय. या निर्णयानंतर अमेरिकेने आणखी एक मोठा निर्णय घेत भारतला झटका दिला. भारतातील ६ कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली.
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला आणखी एक मोठा झटका, टॅरिफनंतर ६ कंपन्यांवर घातली बंदी
Donald TrumpSaam Tv
Published On

Summary -

  • ट्रम्प यांनी भारतावर २५ टकके टॅरिफ लादले

  • त्यानंतर ट्रम्प यांनी ६ भारतीय कंपन्यांवर निर्बंध लावले.

  • या कंपन्यांवर इराणसोबत व्यापार केल्याचा ठपका.

  • भारतासोबतच तुर्की, इंडोनेशिया, UAE मधील कंपन्यांवर बंदी.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के टेरिफ लावण्याची घोषणा केली. एवढेच नाही तर त्यांनी भारतावर मोठा दंडही ठोठावला. यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. टेरिफची घोषणा केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत तेल करार केल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भविष्यात भारताला पाकिस्तानकडून तेल खरेदी करावे लागेल असे सांगितले. या झटक्यानंतर अमेरिकेने भारताला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने इराणसोबत तेल आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या व्यापारात सहभागी असल्याबद्दल ६ भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे हे पाऊल कमाल दबाव धोरणाचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. त्याचा उद्देश इराणमधील आर्थिक व्यवहारांना धक्का देणे आहे.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला आणखी एक मोठा झटका, टॅरिफनंतर ६ कंपन्यांवर घातली बंदी
Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या म्हणण्यानुसार, कार्यकारी आदेश १३८४६ अंतर्गत ६ भारतीय कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, अमेरिकेचा हा कार्यकारी आदेश इराणच्या पेट्रोकेमिकल्स क्षेत्राला लक्ष्य करतो. ट्रम्प प्रशासनाने अशा देशांच्या कंपन्यांनाही लक्ष्य केले आहे जे कोणत्या ना कोणत्या प्रकारे इराणी तेल व्यापारात सहभागी आहेत.अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत, संयुक्त अरब अमिराती, तुर्की आणि इंडोनेशियातील अनेक कंपन्यांवर इराणी मूळच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री आणि खरेदी केल्याबद्दल बंदी घातली जात आहे.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला आणखी एक मोठा झटका, टॅरिफनंतर ६ कंपन्यांवर घातली बंदी
Trump Tariffs: रशियाशी दोस्ती खटकली, डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली; अमेरिका भारताच्या वस्तूंवर लावणार 25 टक्के टॅरिफ

या निवेदनात असेही म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे इराणी तेल किंवा पेट्रोकेमिकल्स खरेदी करण्याचा निर्णय घेणाऱ्या कोणत्याही देशाला किंवा व्यक्तीला अमेरिकेच्या निर्बंधांचा धोका आहे आणि त्यांना अमेरिकेसोबत व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाणार नाही. अमेरिकेने भारतातील कांचन पॉलिमर्स, अल्केमिकल सोल्युशन्स, रमणिकलाल एस गोसालिया अँड कंपनी, ज्युपिटर डाई केम प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल इंडस्ट्रियल केमिकल्स लिमिटेड आणि पर्सिस्टंट पेट्रोकेम प्रायव्हेट लिमिटेडवरया कंपन्यांवर बंदी घातली आहे.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला आणखी एक मोठा झटका, टॅरिफनंतर ६ कंपन्यांवर घातली बंदी
Donald Trump: ट्रम्प यांच्याकडून भारताला धक्का, पाकिस्तानसोबत मोठा करार; म्हणाले - इंडियाला PAK कडूनही तेल खरेदी करावे लागेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com