New Airport: दिवाळी गिफ्ट! देशाला मिळणार लंडन-न्यूयॉर्कसारखे २ मोठे विमानतळ; कुठे आणि कधीपासून होणार सुरू?

India to Get Two Mega Airports: भारताला दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळे मिळणार आहेत. लंडन- न्यूयॉर्क देशामध्ये असणाऱ्या विमानतळासारखीच ही विमानतळे असणार आहेत. कुठे आणि कधीपासून ते सुरू होणार वाचा सविस्तर...
New Airport: दिवाळी गिफ्ट! देशाला मिळणार लंडन-न्यूयॉर्कसारखे २ मोठे विमानतळ; कुठे आणि कधीपासून होणार सुरू?
India to Get Two Mega AirportsSaam Tv
Published On

Summary -

  • दिवाळीत भारताला दोन नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहेत.

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दोन विमानतळे असणार आहेत.

  • पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन्ही विमानतळाचे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

दिवाळीमध्ये भारताला आणखी दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहेत. ही दोन्ही विमानतळं सेवा आणि सुविधांच्या बाबतीत लंडनच्या हीथ्रो विमानतळ आणि न्यूयॉर्क विमानतळापेक्षा जबरदस्त असणार आहेत. यामधील एक विमानतळ नवी मुंबईत आहे तर दुसरे विमानतळ जेवर येथे असणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पीएम मोदींच्या हस्ते येत्या ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. तर जेवरच्या नोएडा आंतरराष्ट्रीय एअरपोर्टसाठी बुकींग नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होईल.

New Airport: दिवाळी गिफ्ट! देशाला मिळणार लंडन-न्यूयॉर्कसारखे २ मोठे विमानतळ; कुठे आणि कधीपासून होणार सुरू?
Navi Mumbai Airport : सप्टेंबर अखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण! कोणत्या प्रवाशांना होणार थेट फायदा?

दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बंगळुरू विमानतळ या सर्व विमानतळांसह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळ आणि नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ देशाला वाहतूक बाजारपेठेत अव्वल स्थानावर नेतील. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला उड्डाण संचालनासाठी एअरोड्रोम परवाना आधीच जारी केला आहे. तर नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळालाही लवकरच हा परवाना मिळण्याची शक्यता आहे.

New Airport: दिवाळी गिफ्ट! देशाला मिळणार लंडन-न्यूयॉर्कसारखे २ मोठे विमानतळ; कुठे आणि कधीपासून होणार सुरू?
Cyberattack On Airports: विमानतळांवर सायबर हल्ला; चेक-इन आणि बोर्डिंग सेवा ठप्प;UK-बेल्जियमसह युरोपच्या फ्लाइट रद्द

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ११६० हेक्टरवर उभारण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात २ कोटी प्रवाशांची क्षमता असेल. पहिला टप्पा १९६४७ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. डिसेंबर २०२५ पासून या विमानतळावरून विमान उड्डाणे सुरू होतील. ४ टर्मिनलसह ९ कोटी प्रवासी क्षमता असेल. ३२.५ लाख मालवाहू क्षमता, १५ कोटी प्रवासी क्षमता असेल. इंडिगो, एअर इंडिया आणि अकासा कंपनीची विमानं इथून उड्डाण घेतील.

New Airport: दिवाळी गिफ्ट! देशाला मिळणार लंडन-न्यूयॉर्कसारखे २ मोठे विमानतळ; कुठे आणि कधीपासून होणार सुरू?
Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा एअर नवी मुंबई विमानतळावरून उड्डाणे सुरू करण्याची तयारी करत आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये इंडिगोने नोएडा विमानतळासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी २ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळावर उड्डाणांच्या तयारीचा आढावा घेतला होता. एनएमआयए हा अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा संयुक्त उपक्रम आहे. ज्यामध्ये एएएचएलचा ७४ टक्के हिस्सा आहे. नवी मुंबई विमानतळ ५ टप्प्यात पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात दरवर्षी २ कोटी प्रवाशांना प्रवास करण्याची क्षमता असेल.

New Airport: दिवाळी गिफ्ट! देशाला मिळणार लंडन-न्यूयॉर्कसारखे २ मोठे विमानतळ; कुठे आणि कधीपासून होणार सुरू?
Navi Mumbai Airport : मोठी बातमी! ८ ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण होण्याची शक्यता | VIDEO

तर नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उद्घाटनानंतर ४५ दिवसांच्या आतमध्ये उड्डाणे सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नोएडा विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात एक धावपट्टी आणि एक टर्मिनल असेल आणि दरवर्षी १.२ कोटी प्रवाशांना सेवा देईल. चौथा टप्पा पूर्ण झाल्यानंतर विमानतळ दरवर्षी ७ कोटी प्रवाशांना सेवा देईल. अंदाजे २ अब्ज डॉलर्स खर्चून बांधलेले नोएडा विमानतळ एनसीआर प्रदेशातील हवाई प्रवासात क्रांती घडवून आणण्याची शक्यता आहे. झुरिच एअरपोर्ट इंटरनॅशनल एजीची १०० टक्के उपकंपनी असलेली यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, जेवर विमानतळ विकसित, बांधणी आणि ऑपरेट करत आहे. विमानतळ मूळतः सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू करण्याचे नियोजन होते. पण आता २०२५ च्या अखेरीस हे विमानतळ सुरू होईल.

New Airport: दिवाळी गिफ्ट! देशाला मिळणार लंडन-न्यूयॉर्कसारखे २ मोठे विमानतळ; कुठे आणि कधीपासून होणार सुरू?
Navi Mumbai Airport: यापुढे लंडनचं विमानतळ फिकं; काय आहे नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com