विद्यार्थी आंदोलनात देवेंद्र महतोंना मारहाण; सहकाऱ्यांनाही पोलिसांची धक्काबुक्की

Devendra Nath Mahato Police Assault During Tricolor Rally In Ranchi: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी रुग्णालयातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या देवेंद्र नाथ महतो यांना पोलिसांनी रोखल्याचा आरोप आहे. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा तसेच सहकाऱ्यांना मारहाण केल्याचा महतो यांचा दावा.
DEVENDRA NATH MAHATO ALLEGES POLICE ASSAULT DURING RANCHI TIRANGA YATRA
DEVENDRA NATH MAHATO ALLEGES POLICE ASSAULT DURING RANCHI TIRANGA YATRAsaam tv
Published On

स्वातंत्र्यदिनानिमित्त रांचीमध्ये जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत सहभागी सहभागी होण्यासाठी झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे नेते देवेंद्र नाथ महतो हे रुग्णालयातून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. मात्र, त्याचवेळी पोलिसांनी त्यांना बाहेर जाण्यापासून रोखले. पोलिसांनी आपल्यासोबत धक्काबुक्की केल्याचा आरोप महतो यांनी केला आहे.

DEVENDRA NATH MAHATO ALLEGES POLICE ASSAULT DURING RANCHI TIRANGA YATRA
Abhijit Dipke : जंतर-मंतरवर अभिजित दिपकेंना पोलिसांची मारहाण, आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न, खळबळजनक आरोप

महतो यांनी सांगितले की, जो पर्यंत आपल्याला रुग्णालयातून बाहेर जाण्याची परवानगी दिली जात नाही, तो पर्यंत आपण आपल्या रूमच्या गेटवरच बसून राहणार असून उपचारही करून घेणार नाही. देवेंद्र नाथ महतो यांची आमरण उपोषणाची आज 14 वा दिवस आहे. त्यांनी 2 ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे. विधानसभेला घेराव घातल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

DEVENDRA NATH MAHATO ALLEGES POLICE ASSAULT DURING RANCHI TIRANGA YATRA
Mumbai : दोन महिलांच्या धमक्या अन् २४ वर्षीय तरुणानं आयुष्य संपवलं, धक्कादायक घटनेने मुंबई हादरली

स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा हातात घेऊन बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांचा मार्ग अडवला. त्यांना रुग्णालयातच विश्रांती घेण्यास सांगण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला असून, त्यामध्ये महतो बाहेर जाण्याचा प्रयत्न करताना आणि पोलिस त्यांना अडवताना दिसत आहेत. यावेळी महतो यांनी पोलिसांवर जबरदस्तीने रुग्णालयात डांबून ठेवण्याचा आरोप केला. तुम्ही मला आत ठेवून माझा जीव घेत आहात असा आरोप त्यांनी केला. महतो यांनी तिरंगा यात्रेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या रुग्णालयातील खोलीबाहेर मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

DEVENDRA NATH MAHATO ALLEGES POLICE ASSAULT DURING RANCHI TIRANGA YATRA
Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

दरम्यान, महतो यांनी 'एक्स'वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पोलिस त्यांना जबरदस्तीने पकडताना दिसत आहेत. १४ दिवसांपासून उपोषणावर असलेल्या आपल्यासोबत पोलिसांनी धक्काबुक्की केली, असा आरोप महतो यांनी केला. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com