Crime News : भाच्याच्या प्रेमात आकंठ बुडाली, दुबई रिटर्न नवऱ्याला बायकोनं निर्घृणपणे संपवलं; सूटकेसमध्ये भरून शेतात फेकलं

husband killing case in Deoria : मेरठमधील ड्रम हत्याकांडानंतर उत्तर प्रदेश आणखी एका सूटकेस हत्याकांडानं हादरलं. दुबईहून गावी आलेल्या नवऱ्याची त्याच्या बायकोनेच बॉयफ्रेंडच्या मदतीने हत्या केली.
दुबईवरून आला, बायकोनं जीव घेतला; गिफ्ट दिलेल्या सूटकेसमध्येच मृतदेह भरून शेतात फेकला
deoria killing case wife kills dubai returned husband@DeoriaPolice/X
Published On

निळा ड्रम हत्याकांडानं अवघा देश हादरला होता. बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याची हत्या करून तुकडे निळ्या ड्रममध्ये भरले होते. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ही हादरवणारी घटना घडली होती. आता याच राज्यात देवरीयामध्ये सूटकेस हत्याकांड घडलं आहे. भाच्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या महिलेनं दुबईहून घरी आलेल्या नवऱ्याची हत्या केली. त्याचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून ५० किलोमीटर दूरवर असलेल्या शेतात फेकली. धक्कादायक म्हणजे, ती सूटकेस नवऱ्यानेच तिला खूश करण्यासाठी गिफ्ट केली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, नौशाद असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. देवरियामधील मईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भटौली गावचा रहिवासी होता. त्याचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून गावापासून ५० किलोमीटरवर असलेल्या तरकुलवां पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतात फेकण्यात आला होता.

नौशाद हा दुबईत नोकरी करायचा. नुकताच तो आपल्या गावी आला होता. पण तो दुबईला असताना, त्याची बायको रजिया ही एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. नात्यानं तो भाचा होता. नौशाद परत गावी आल्यानं त्यांच्या प्रेमात अडसर ठरत होता. त्यामुळे दोघांच्या भेटीगाठी होणं कठीण झालं होतं. त्याचा अडसर दूर करायचा असा क्रूर विचार तिच्या मनात आला. तिनं बॉयफ्रेंडला नवऱ्याच्या हत्येचा प्लान सांगितला. त्यानंतर दोघांनी मिळून नौशादची हत्या केली.

शेतात बेवारस सूटकेस मिळाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. काही गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सूटकेस उघडून बघितली. त्यात मृतदेह होता. तपास केला असता, तो नौशाद असल्याचं स्पष्ट झालं. त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा होत्या. त्यानंतर फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि सर्व्हिलान्स टीम घटनास्थळी पोहोचले. तपासानंतर अनेक चक्रावणाऱ्या घटना समोर आल्या. नौशाद आठवडाभरापूर्वीच दुबईहून गावी आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. बायकोवर संशयाची सुई होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतली.

बायकोनं दिली कबुली

पोलिसांनी रजियाला ताब्यात घेतलं. तिच्याकडे चौकशी केली. तिनं हत्येची कबुली दिली. हत्येचं कारण ऐकून सगळेच हादरले. रजियानं चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती नौशाद दुबईत होता. रजिया घरी एकटीच असायची. त्याचवेळी भाचा रोमानसोबत तिचं सूत जुळलं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आठवडाभरापूर्वी आलेल्या नौशाद त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत होता. दोघांनी अनेकदा भेटण्याचा प्रयत्न केला, पण शक्य होत नव्हतं. शेवटी नौशादचा काटा वाटेतून दूर करायचा असा कट दोघांनी आखला. नौशादची हत्या केल्यानंतर सूटकेसमध्ये भरून ५० किलोमीटर दूरवर एका शेतात ती फेकून दिली.

दुबईवरून आला, बायकोनं जीव घेतला; गिफ्ट दिलेल्या सूटकेसमध्येच मृतदेह भरून शेतात फेकला
Crime News: डोक्यावर काचेचा ग्लास फोडला, कपडेही फाडले; दारूच्या अड्ड्यावर राडा, क्षुल्लक कारणावरून तरूणाला चोपला

नौशाद बरीच वर्षे दुबईत होता. तिथं तो नोकरी करायचा. त्यातून मिळालेल्या पैशातून त्यानं गावाच्या बाहेर जमीन खरेदी करून घर बांधलं. या घरात त्याची बायको रजिया आणि वृद्ध वडील राहायचे. यावेळी तो रजियाला खूश करण्यासाठी दुबईतून दोन मोठ्या सूटकेस घेऊन आला. त्या सूटकेस खूप महागड्या होत्या. त्यातीलच एका सूटकेसमध्ये नौशादचा मृतदेह भरून फेकून देण्यात आला. रजिया आणि भाचा रोमानला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, अशी मागणी नौशादच्या बहिणीनं केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, यात रजिया, भाचा रोमान आणि त्याच्या एका मित्राचाही या हत्या प्रकरणात सहभाग आहे. आरोपी आणि त्याचा मित्र अद्याप फरार आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

दुबईवरून आला, बायकोनं जीव घेतला; गिफ्ट दिलेल्या सूटकेसमध्येच मृतदेह भरून शेतात फेकला
Crime: आधी लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर, मग पीडित महिला अन् मुलीवर बलात्कार; विधवा महिलेसोबत आरोपीने नको ते..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com