Arvind Kejriwal
Arvind KejriwalSaam Tv

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना जेल की बेल? आज होणार हायकोर्टात निर्णय

Delhi Politics News: अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज उच्च न्यायालय निकाल देणार आहे. ईडीने २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती.

Arvind Kejriwal News Update

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज उच्च न्यायालय निकाल देणार आहे. ३ एप्रिल रोजी सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. केजरीवाल सध्या कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. ईडीने २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. (latest politics news)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार की त्यांना दिलासा मिळणार? यावर आज निर्णय होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालय आज दुपारी अडीच वाजता कथित दारू घोटाळ्याशी संबंधित (Delhi Politics) मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर निकाल देणार आहे. यापूर्वी हायकोर्टाने ३ एप्रिल रोजी निर्णय राखून ठेवला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या आठवड्यात केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. कोर्टात युक्तिवाद करताना केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी त्यांची अटक 'स्क्रिप्टेड' असल्याचे सांगितले होते. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या वेळेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सिंघवी म्हणाले की, (Arvind Kejriwal Plea Liquor Policy Case) ' अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीदरम्यान अटक का? निवडणुकीमध्ये सहभागी होण्यापासून त्यांना रोखलं जात आहे. आम आदमी पार्टी फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ईडीचे पहिले समन्स ऑक्टोबरमध्ये जारी करण्यात आले होते. पण त्यांना अटक मार्चमध्येच झाली आहे.

सिंघवी यांच्या युक्तिवादांना उत्तर देताना ईडीच्या वतीने एएसजी एसव्ही राजू म्हणाले की, 'समजा एखाद्या राजकीय व्यक्तीने निवडणुकीच्या दोन दिवस आधी खून केला. त्याला अटक होणार नाही का? आम्ही मालमत्ता अटॅच (Liquor Policy Case) केली, तर ते म्हणतील की निवडणूक आहे, असा युक्तिवाद करण्यात आला.

Arvind Kejriwal
Arvind Kejariwal Arrest ED : मुख्यमंत्र्यांपासून राज्यसभा खासदारांपर्यंत... कोण आहेत दिल्ली मद्य घोटाळ्यात अटक झालेले १६ जण?

तब्बल ५ तास चाललेल्या चर्चेनंतर न्यायालयाने (Delhi High Court) निर्णय राखून ठेवला होता. अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी त्यांच्या दिल्लीतील घरातून अटक करण्यात आली होती. यानंतर ते ईडीच्या रिमांडमध्ये आणि आता तिहार तुरुंगात आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत आम आदमी पक्ष सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे.

केजरीवाल यांच्या याचिकेवर दिल्लीचे राऊस एव्हेन्यू न्यायालय आज निकाल देणार आहे. यामध्ये केजरीवाल यांनी त्यांच्या वकिलांना भेटण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला होता. केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांचे वकील विवेक जैन यांनी गेल्या आठवड्यात सुनावणीदरम्यान असा युक्तिवाद केला होता की, केजरीवाल कोणत्याही दिलाश्याची मागणी करत नाहीत. तर ते अनेक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांबाबत केवळ वकिलांशी अतिरिक्त बैठक घेण्याची मागणी करत आहेत.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal: चौकशीदरम्यान केजरीवाल यांनी आपच्या कोणत्या 2 नेत्यांची घेतली नावे? कोर्टात ईडीने काय केला दावा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com