Lashkar-e-Taiba terrorist: मोठी बातमी! दिल्लीत लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला अटक

Lashkar-e-Taiba terrorist arrested: दिल्लीत लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या दहशतवाद्याला दिल्ली रेल्वे स्टेशनवर अटक कली आहे. रियाज अहमद असे या दहशतवाद्याचे नाव आहे.
delhi police
delhi police Saam tv
Published On

New Delhi Latest News:

राजधानी दिल्लीतून मोठं वृत्त हाती आलं आहे. दिल्लीत लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या दहशतवाद्याला दिल्ली रेल्वे स्टेशनवर अटक कली आहे. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये हा दहशतवादी सक्रिय होता. रियाज अहमद असे या दहशतवाद्याचे नाव आहे. (Latest Marathi News)

दिल्ली पोलिसांनी माहितीनुसार, दहशतवादी रियाजने एलओसीच्या बाहेर शस्त्र आणि दारूगोळा मिळविण्याच्या कामात मोठी भूमिका निभावली होती. आरोपी हा निवृत्त सैनिक आहे. दहशतवादी रियाज कोणत्या हेतूने राजधानी दिल्लीत आला होता, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

delhi police
Uniform Civil Code : लिव्ह इन रिलेशनशिप, लग्नाचं वय अन् ४०० हून अधिक कलम, समान नागरी विधेयकात काय आहे खास?

दहशतवादी रियाज हा शस्त्रे आणि दारूगोळा मिळविण्याच्या कामात खुर्शीद अहमद राथर आणि गुलाम सरवर राथरसोबत सामील असायचा. रियाज हा कश्मीरच्या कुपवाडा येथील राहणारा आहे. गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी रियाजला अटक केली.

delhi police
Amaravati Crime News: शरीर संबंधास नकार दिल्याने महिलेची डोक्यात दगड घालून हत्या; मृतदेह विहिरीत फेकला

पोलिसांच्या माहितीनुसार, रियाजकडून मोबाईल फोन आणि एक सिम कार्ड जप्त करण्यात आलं आहे. रियाजला अटक केल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना कळविण्यात आलं आहे.

अन् दहशतवादी अडकला पोलिसांच्या जाळ्यात

दहशतवादी रियाज ४ फेब्रुवारीला दिल्ली रेल्वे पोलीस स्टेशन येणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी पथक तयार करत नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्रत्येक गेटवर पोलीस तैनात केले. रियाज अहमद नवी दिल्ली स्टेशनच्या एक्झिट गेट नंबर १ वरून पळून जाणाच्या तयारीत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ओळखून अटक केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com