चंदीगड: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांचा आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने पराभव केला आहे. सिंग यांचा ज्या मतदारसंघातून पराभूत झाले आहेत त्याच मतदारसंघामधून ते मागील वेळी राज्यात सर्वाधिक 52,407 मतांनी जिंकली होती.(Punjab Assembly Election Result 2022).
पंजाबच्या (Panjab) मुख्यमंत्रीपदावरून बाजूला झाल्यावर कॅप्टन यांनी नव्या पक्षाची स्थापना केली होती, तसंच त्यांनी भाजपशी जवळीक साधली होती. मात्र त्यांच्या या रणनितीचा काही फायदा झालेला नाही. कारण पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला (Aam Aadmi Party) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.
आप सध्या 87 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस 18 जागांवर आघाडीवर आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच आम आदमी पक्षाचे उमेदवार अजित पाल यांनी पराभव केला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.