या शहरांमध्ये मास्क घालणे अनिवार्य; कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय

राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा एकदा मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत.
corona mask
corona mask
Published On

वृत्तसंस्था: उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाची वाढती संख्या पाहता राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा एकदा मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. सीएम योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दिल्लीला लागून असलेल्या गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, मेरठ, हापूर, बागपत, बुलंदशहरसह लखनऊमध्ये (Lucknow) मास्क अनिवार्य केले आहेत. गेल्या आठवड्यापासून यूपीमध्ये कोरोनाच्या (Corona) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून, त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने (State Government) हा निर्णय घेतला आहे. (decision taken Chief Minister due increasing number patients Corona)

हे देखील पहा-

यूपीच्या या जिल्ह्यांमध्ये मास्क आवश्यक

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) गेल्या ४ दिवसांपासून सातत्याने १०० हून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. गेल्या २४ तासांत यूपीमध्ये ११५ नवीन रुग्ण आढळले असून, त्यानंतर राज्यात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६९५ झाली आहे. जानेवारी महिन्यानंतर राज्यात पहिल्यांदाच कोरोनाचे इतके रुग्ण आढळून येत आहेत. सर्वाधिक प्रकरणे फक्त दिल्लीत (Delhi) असलेल्या नोएडा आणि गाझियाबादमध्ये दिसून येत आहेत. यूपीच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नोएडामध्ये ६५, गाझियाबादमध्ये २० आणि लखनऊमध्ये गेल्या २४ तासात १० कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत.

corona mask
मशिदीवर झेंडा लावण्याचा आरोप चुकीचा; किरकोळ कारणावरून वाद

योगी सरकारने दिल्या सूचना

याआधीही सीएम योगींनी एनसीआर आणि लगतच्या जिल्ह्यांतील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिले होते. त्यानंतर आता नोएडा, गाझियाबाद, लखनौ, हापूर, मेरठ, बुलंदशहर आणि बागपतमध्ये पुन्हा मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. यासोबतच या जिल्ह्यांमध्ये लसीकरण झालेले नसलेल्यांची लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. आणि ज्यांना लक्षणे दिसतील त्यांची तत्काळ चाचणी करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com