Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू
Cough SyrupSaam Tv

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू

Cough Syrup Tragedy: कफ रिसपमुळे मध्य प्रदेशमध्ये २० मुलांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली. चेन्नईमधून अटक करण्यात आली असून त्यांना मध्य प्रदेशमध्ये आणले जात आहे.
Published on

Summary -

  • श्रीसन फार्मा कंपनीचे मालक रंगनाथन गोविंदन यांना अटक

  • ‘कोल्ड्रिफ’ नावाच्या कफ सिरफमुळे मध्य प्रदेशमध्ये २० मुलांचा मृत्यू

  • चेन्नईतून रंगनाथन गोविंदन यांना अटक

  • औषधामुळे किडनी निकामी झाल्याने मुलांचा मृत्यू

मध्य प्रदेशमध्ये कफ सिरप प्यायल्यानंतर किडनी निकामी झाल्यामुळे २० मुलांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशच्या विशेष तपास पथकाने विषारी कफ सिरप तयार करणाऱ्या कंपनीच्या मालकाला बेड्या ठोकल्या आहेत. श्रीसन फार्माचा मालक रंगनाथन गोविंदन यांना पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. रंगनाथन यांना शोधण्यासाठी पोलिसांनी २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या विशेष तपास पथकाने विषारी कफ सिरप 'कोल्ड्रिफ' बनवणारी कंपनी श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना रात्री अटक केली. हे प्रकरण समोर आल्यानंतर रंगनाथन यांच्या चेन्नईतील घराला आणि तामिनाडूतील कांचीपूरम येथील कारखान्याला टाळा लावण्यात आला होता. घराला कुलूप लावून रंगनाथन आपल्या कुटुंबीयांसोबत फरार होते. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली.

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू
Cough Syrup: खोकल्याचं औषध ठरलं विष; 14 मुलांचा मृत्यू, कफ सिरपबाबत सरकारचा निर्णय काय?

कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे आतापर्यंत २० मुलांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशमध्ये एकापाठोपाठ एक असं लहान मुलांच्या मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. यामुळे मध्य प्रदेशमध्ये भीतीचे वातावरण आहे. या कफ सिरपने या मुलांचा जीव घेतला. या घटनेनंतर ५ ऑक्टोबरला छिंदवाडा येथील पारसिया पोलिस ठाण्यामध्ये श्रीसन फार्मा कंपनीचे संचालक, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण सोनी यांच्यासह आणखी काही जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू
Cough Syrup: मुलांना कफ सिरप देताय? सावधान! खोकल्याचं औषध की विष?

त्यानंतर पोलिसांनी या कप सिरप प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणी डॉ प्रवीण सोनी यांना अटक करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कंपनीच्या फरार मालकाला अटक करण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. बुधवारी रात्री कंपनीच्या मालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यांना आता चेन्नईवरून भोपाळला आणण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू
Cough Syrup : कफ सिरपमुळं नागपुरात दाखल झालेल्या १३ मुलांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा खळबळून जागे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com