Coldref Syrup Ban: कफ सिरपनं घेतला 18 मुलांचा बळी, राज्य सरकारनं मोठा निर्णय

Coldref Cough Syrup Ban in Maharashtra: कफ सिरपनं 18 मुलांचा बळी घेतल्यानंतर आता राज्य सरकारनं कफ सिरपसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय.. अन्न आणि औषध प्रशासनाकडून कफ सिरपच्या वितरण आणि विक्रीसंदर्भात नेमके काय आदेश देण्यात आलेत
Maharashtra Health Minister Prakash Abitkar addressing media after ordering Coldref syrup ban.
Maharashtra Health Minister Prakash Abitkar addressing media after ordering Coldref syrup ban.Saam Tv
Published On

खोकल्यावर उपचार म्हणून दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमुळे मध्य प्रदेशात 14 तर राजस्थानमध्ये 3 मुलांचा मृत्यू झाला.. आणि सरकारी यंत्रणा खाडकन् जागी झाली.. वेगवेगळ्या राज्यात कोल्ड्रिफ कफ सिरपवर बंदी घालण्यात आलेली असताना राज्य सरकारनंही कफ सिरपसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय...

राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून टोल फ्री नंबर जारी करण्यात आलाय. 1800 222 365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेय..मेडिकलमध्ये एप्रिल 2017 ते मे 2025 या कालावधीतील कोल्ड्रिफ सिरप आढळल्यास माहिती देण्याच्या सूचना. कोल्ड्रिफ औषधाचा साठा आढळल्यास तो गोठवण्याचे औषध निरीक्षकांना निर्देश. कोल्ड्रिफ सिरपमध्ये डायइथिलीन ग्लायकॉल नावाचा विषारी घटक असल्याचं समोर आलयं..

दरम्यान 2 वर्षाच्या आतील मुलांना खोकल्याचं औषध अजिबात देऊ नये, अशा सूचना केंद्रानं दिल्यात.. मात्र ज्या केमिकलचा वापर वाहनांमध्ये ब्रेक ऑईलमध्ये केला जातो... त्याचा वापर लहान मुलांना देणाऱ्या येणाऱ्या सिरपमध्ये तब्बल 48 टक्के प्रमाणात कसा केला जातो? अन्नातील भेसळीमुळे आधीच मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतं असताना लहान मुलांच्या औषधातही भेसळ होत असेल तर सर्वसामान्यांनी नेमकं काय करायचं?

दसरा, दिवाळीला खवा, मेव्यातील भेसळ पकडून स्वत:ची पाठ थोपटून घेणारं अन्न आणि औषध प्रशासन विभाग औषधातील भेसळ रोखण्यात अपयशी का ठरलं? कफ सिरपमुळे 18 मुलांच्या मृत्यू झालेला असताना या घटनेला भेसळयुक्त औषधासोबतच झोपी गेलेली प्रशासकीय यंत्रणाही जबाबदार आहे का? याचा विचार तुम्हीच करा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com