Rain Alert : येत्या ४८ तासांत रेमल चक्रीवादळ धडकणार, 'या' राज्यांमध्ये तुफान पाऊस कोसळणार; IMD कडून अलर्ट

Remal Cyclone Rain Alert : शनिवारी रात्रीपर्यंत रेमन चक्रीवादळ रौद्ररुप धारण करू शकते. हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांग्लादेश किनारपट्टीला धडकण्याची दाट शक्यता आहे.
येत्या ४८ तासांत रेमल चक्रीवादळ धडकणार, 'या' राज्यांमध्ये तुफान पाऊस कोसळणार; IMD कडून अलर्ट
Remal Cyclone Rain AlertSaam TV

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमन चक्रीवादळाने टेन्शन वाढवलं आहे. येत्या ४८ तासांत हे चक्रीवादळ बांग्लादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

येत्या ४८ तासांत रेमल चक्रीवादळ धडकणार, 'या' राज्यांमध्ये तुफान पाऊस कोसळणार; IMD कडून अलर्ट
Weather Update : पाकिस्तानी वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापला; अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार, उष्णतेच्या लाटेचा इशारा

काही भागात वादळी वारे देखील वाहण्याचा अंदाज आहे. यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. आयएमडीने शुक्रवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये असं म्हटलं की, शनिवारी रात्रीपर्यंत रेमन चक्रीवादळ रौद्ररुप धारण करू शकते. हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांग्लादेश किनारपट्टीला धडकण्याची दाट शक्यता आहे.

रविवारी वाऱ्यांचा ताशी वेग १२० किमीपर्यंत पोहोचू शकतो. परिणामी २६ आणि २७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टी भागात तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे.

रेमन चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, उत्तर २४ आणि दक्षिण २४ परगणा, त्याचबरोबर पूर्व मिदनापूरच्या किनारी जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर उत्तर ओरिसा, बंगाल, त्रिपुरा, दक्षिण मणिपूर आणि मिझोराममध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.

महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

आयएमडीच्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. शनिवारी आणि रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. काही भागात उन्हाचा कडाका देखील वाढणार आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो.

येत्या ४८ तासांत रेमल चक्रीवादळ धडकणार, 'या' राज्यांमध्ये तुफान पाऊस कोसळणार; IMD कडून अलर्ट
Weather Forecast : सावधान! महाराष्ट्रात येत्या ३-४ तासांत कोसळणार मुसळधार पाऊस; नाशिकसह ९ जिल्ह्यांना अलर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com