Cyclone Montha: आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावर १०० किलोमीटर स्पीडनं धडकलं चक्रीवादळ; 'मोंथा' नावाचा अर्थ काय?

Cyclone Montha: चक्रवादळ मोंथाचं लँण्डफॉल सुरू झालंय. ही प्रक्रिया पुढील ३ ते चार चालेल. हवामान विभागानुसार वादळ, आंध्र प्रदेशचे काकीनाडा किनाऱ्याला ओलांडत आहे.
Cyclone Montha:
Cyclone Montha makes landfall near Kakinada with 100 km/h winds; IMD warns of heavy rain and storm surge.saam tv
Published On
Summary
  • आंध्र प्रदेशातील काकीनाडा किनाऱ्यावर मोंथा चक्रीवादळ धडकलं.

  • वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर आहे.

  • उत्तर आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस

आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर मोंथा चक्रीवादळ धडकलंय. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, काकीनाडाजवळ भूस्खलन झालंय. येथे वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर आहे. किनारीपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे सुरू आहे. तर या चक्रीवादळामुळे उत्तर आंध्र प्रदेशात पूर आणि एक मीटर उंचीच्या वादळी लाटा उफाळून येणार असल्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास आणि आपत्कालीन सेवांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

चक्रवादळामुळे मोंथा लँण्डफॉल सुरू झालंय. ही प्रक्रिया पुढील तीन ते चार तास असेन. हवामान विभागानुसार, चक्रवादळ १०० ते ११० किलोमीटरच्या प्रति तास गतीनं वारे वाहत आहे. या स्पीडनं आंध्र प्रदेशमधील काकीनाडाच्या आसपासच्या किनारा पार करत आहे. यामुळे किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि उंच लाटांचा धोका वाढलाय. अधिकाऱ्यांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिलेत आणि आपत्कालीन सेवांना सतर्क करण्यात आले आहे.

Cyclone Montha:
Cyclone Montha Update : 'मोंथा' चक्रीवादळाचा तडाखा बसणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या

काय आहे मोंथा चक्रीवादळाच्या शब्दाचा अर्थ

पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीतून मोंथा नावाचं भयानक चक्रीवादळ आलंय. हे चक्रीवादळ १०० ते ११० किलोमीटरच्या गतीने आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले. पुढील तीन तासांपर्यंत हे वादळ आंध्र किनाऱ्यावरून हळूहळू पुढे सरकेल. बुधवारी दुपारी ते मछलीपट्टनमपासून सुमारे १०० किलोमीटर आणि काकीनाड्यापासून १८० किलोमीटर अंतरावर होते.

इतक्या भयानक चक्रीवादळाचं नाव 'मोंथा' कसं पडलं आणि त्याचा अर्थ काय आहे, हे जाणून घेऊ. संध्याकाळी चक्रीवादळाने वेग वाढवला आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकला. दरम्यान थाई भाषेत "मोंथा" म्हणजे सुगंधित फूल, म्हटलं जातं.

हे वादळ आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथून पुढे जाईल, ज्यामुळे दक्षिण बंगालमधील उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, झारग्राम, पुरुलिया, पूर्व आणि पश्चिम वर्धमान, बीरभूम आणि मुर्शिदाबाद या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com