Indian Meteorological Department On Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone) धोका वाढण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ येत्या काही तासांमध्ये तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टी भागांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे पुढचे सहा तास खूपच महत्वाचे आहेत. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळे 12 जूनपर्यंत अरबी समुद्र खवळलेला राहणार आहे. हे चक्रीवादळ पूर्व -मध्य अरबी समुद्रावर 11 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 510 किलोमीटर अंतरावर होते. पुढच्या 12 तासांमध्ये हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
या चक्रीवादळामुळे 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. त्याचसोबत या काळामध्ये वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे नागरिक, पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
हवामान खात्याने पुढे असे देखील सांगितले आहे की, बिपरजॉय चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तरी देखील या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकसह गोव्यामध्ये दिसून येणार आहे. कारण या वादळामुळे या राज्यामध्ये जोरदार वादळी वारे आणि मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.