Earthquake Rescue: म्यानमारमधील भूकंपानंतर बचाव कार्यासाठी 'सायबॉर्ग झुरळांची' मदत, पाहा व्हिडिओ

Myanmar Earthquake: म्यानमारमधील ७.७ तीव्रतेच्या भूकंपानंतर, सिंगापूरच्या संशोधकांनी सायबोर्ग झुरळे विकसित केली असून, ती ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना शोधण्यात मदत करणारे सेन्सर्ससह सज्ज असतील.
Earthquake Rescue
Earthquake Rescuegoogle
Published On

म्यानमारमध्ये अलीकडेच झालेल्या ७.७ तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपानंतर बचाव कार्य वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, सिंगापूरच्या होम टीम सायन्स अँड टेक्नॉलॉजी (HTX) ने नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि क्लास इंजिनिअरिंग अँड सोल्युशन्सच्या सहयोगाने विशेष सायबॉर्ग झुरळांची निर्मिती केली आहे.

हे रोबोटिक झुरळ अत्याधुनिक कॅमेरे आणि इन्फ्रारेड सेन्सर्ससह सुसज्ज असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. सध्या १० सायबॉर्ग हायब्रिड झुरळ तयार करण्यात आले असून, त्यांना नायपिडॉ आणि मंडाले या भूकंपग्रस्त भागांमध्ये तैनात करण्यात येणार आहे. ही झुरळे अरुंद, धोकादायक भागात सहज प्रवेश करू शकतात, त्यामुळे बचाव पथकाला अचूक माहिती मिळून मदतकार्यात मोठी सोय होणार आहे.

Earthquake Rescue
Shocking Video: प्रसाद खरेदीला नकार, भाविकाला मारहाण; व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये संताप

सिंगापूरच्या HTX संस्थेने विकसित केलेली सायबॉर्ग झुरळे अशा ठिकाणी वापरण्यात येणार आहेत, जिथे बचाव पथकांना सहज प्रवेश करता येत नाही. ही रोबोटिक कीटक ढिगाऱ्याच्या आत व अरुंद जागांमध्ये सहज फिरू शकतात. त्यांच्यावर बसवलेले कॅमेरे आणि सेन्सर वापरून अडकलेल्या लोकांचे ठिकाण शोधता येते. HTX च्या रोबोटिक्स सेंटरचे ओंग का हिंग सांगतात की, या क्षेत्रात रोबोटिक हायब्रिड कीटकांचा वापर प्रथमच होत आहे. आम्हाला अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि वेळ अत्यंत कमी आहे. या प्रकल्पामुळे भविष्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे.

Earthquake Rescue
Gas cylinder explosion : घरात अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट, आजी-नातू आगीच्या विळख्यात, वाशिममध्ये हळहळ

HTX चे याप कियान सांगतात की, आम्ही अनेक वेळा ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांशी संवाद साधला, यामुळेच लोकांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली. हवामान, वीज नसणे आणि अपयशाची शक्यता असूनही, HTX टीम मदतीसाठी खंबीरपणे तैनात आहे. ते स्पष्ट करतात की, जोपर्यंत मदतीची गरज आहे, तोपर्यंत आम्ही येथेच राहू. सध्या रोबोट्सनी कुणालाही शोधले नसले तरी अरुंद जागांची स्कॅनिंग करण्यासाठी त्यांचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो आहे.

अभियंत्यांच्या मते, हे सायबोर्ग झुरळे मूळतः २०२६ मध्ये वापरण्याचे नियोजन होते. मात्र, आपत्कालीन परिस्थितीमुळे त्यांची तातडीने तैनाती करण्यात आली. तज्ज्ञांचे मत आहे की प्रत्यक्ष मदतकार्यातून मिळणारा अनुभव आणि अभिप्राय या रोबोट्सच्या तांत्रिक प्रगतीला अधिक गती देईल आणि भविष्यातील बचाव कार्य अधिक प्रभावी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com