
मणिपूरमध्ये एका सीआरपीएफ जवानाने सैनिकांच्या छावणीवर गोळीबार केला त्यानंतर त्याने स्वत:ला गोळी झाडली. जवानाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत तर ८ जवान जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री ८.२० च्या सुमारास इंफाळ जिल्ह्यातील पश्चिम भागातील लामफेल येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कॅम्पमध्ये घडली. गोळीबार करणारा सैनिक संजय कुमार हा १२० व्या बटालियनचा हवालदार (सार्जंट) होता.
सैनिकाच्या छावणीवर गोळीबार केल्यानंतर संजय कुमार या जवानाने स्वतःवर गोळीबार करत आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा जवान आसामचा रहिवासी होता. संजय कुमार हा त्रिसुंडी येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये तैनात होता. या घटनेत जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ते घटनाचा तपास करत आहेत.
दरम्यान संजय कुमार या जवानाने गोळीबार का केला याच कारण असून समोर आले नाहीये. दरम्यान या घटनेचा तपास झाल्यानंतरच गोळीबार आणि आत्महत्येचं कारण समजू शकले असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. दरम्यान सीआरपीएफचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ते घटनेचा आढावा घेत आहेत. याप्रकरणी सध्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाहीये. अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केलाय.
हाती आलेल्या माहितीनुसार, या गोळीबारीच्या घटनेत आठ जवान जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी इंफाळ येथील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये दाखल करण्यात आले आहे. लष्कराच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा उपस्थित आहे. या घटनेमुळे सीआरपीएफमध्ये खळबळ उडालीय. मणिपूरमध्ये आज म्हणजेच गुरुवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलीय. चार दिवसांपूर्वी म्हणजेच ९ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. विधानसभेचे कामकाजही स्थगित करण्यात आले आहे. गृह मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून केंद्रीय नियमाची घोषणा केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.