IED Blast at LOC in Jammu : जम्मूमध्ये LOC जवळ दहशतवादी हल्ला; स्फोटात २ जवान शहीद, १ गंभीर जखमी

IED Blast In Jammu-Kashmir : जम्मूच्या एलओसीजवळ आज संध्याकाळच्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये सैन्यातील दोन सैनिक शहीद झाले. हा हल्ला दहशतवादी संघटनांनी घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
IED Blast at LOC in Jammu
IED Blast at LOC in JammuSaam Tv
Published On

जम्मू सेक्टरच्या एलओसीजवळ आज आयईडी स्फोट झाला. या स्फोटामध्ये लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तर एक जवान गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना जम्मूच्या अखनूर भागात घडली आहे. हा स्फोटाचा कट दहशतवादी संघटनांद्वारे रचण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात सैन्याकडून तपासाला सुरुवात झाली आहे.

या घटनेची माहिती लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्स एका एक्स पोस्टद्वारे दिली. या पोस्टमध्ये 'अखनूर सेक्टरमधील लालेली येथे कुंपणावर सैन्याचे जवान गस्त घालत होते. तेव्हा त्यांना एका संशयित इम्प्रोव्हाइज्ड स्फोटक उपकरणाच्या स्फोटाची माहिती मिळाली. या स्फोटात दोन जवान शहीद झाले. परिसरात सर्च ऑपरेशन सुरु झाले आहे. व्हाईट नाइट कॉर्प्स या दोन्ही शूर सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम करते' असे लिहिले आहे.

हा स्फोट संध्याकाळी ५.३० च्या सुमारास झाला. स्फोट झाल्यानंतर लगेचच संपूर्ण परिसरात जमावबंदी करण्यात आली. स्फोटामध्ये गंभीरपणे जखमी झालेल्या सैनिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या जखमी सैनिकाची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे.

IED Blast at LOC in Jammu
Narendra Modi France Visit : AI मुळे नोकऱ्या जाणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "सगळ्यात मोठी भीती.."

कालच जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान केंद्र शासित प्रदेशांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था यासंबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली होती. या भेटीनंतर आज झालेल्या महत्त्वपूर्ण या दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

IED Blast at LOC in Jammu
EVM चा डेटा डिलीट किंवा रिलोड करू नका; निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com