Viral Video : होळीच्या नावाखाली जोडप्यासोबत टवाळखोरांचं गैरवर्तन, वाराणसीतील संतापजनक व्हिडीओ समोर

Varanasi Holi viral video : मणिकर्णिका घाटावरुन जाताना तरुणीच्या अंगावर फुगे मारण्यात आले. पाणी फेकण्यात आलं. एकाने समोरुन येत तरुणीच्या अंगावर बाटलीने पाणी ओतलं.
VAranasi Viral video
VAranasi Viral video Saam TV

Viral Video :

देशभरात होळी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात खेळली गेली. होळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र होळी सणाला गालबोट लावणारा एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. टवळखोरांनी एका जोडप्यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीतील मणिकर्णिका घाटावरील ही घटना असल्याचं समजतं. एक तरुण आणि तरुणी मणिकर्णिका घाटावर होळीच्या दिवशी आले होते.  होळी सण साजरा करण्यासाठी मोठी गर्दी त्याठिकाणी जमली होती. या गर्दीत काही टवाळखोर देखील होते. या टवाळखोरांनी या जोडप्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला.

VAranasi Viral video
Viral Video: आवरा रे ह्यांना! धावत्या स्कुटीवर तरुणींचा अश्लिल डान्स अन् रोमान्स; पोलिसांचा दणका| VIDEO

मणिकर्णिका घाटावरुन जाताना तरुणीच्या अंगावर फुगे मारण्यात आले. पाणी फेकण्यात आलं. एकाने समोरुन येत तरुणीच्या अंगावर बाटलीने पाणी ओतलं. तरुणीसोबत असलेल्या तरुणाने टवाळखोरांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तरुणाला रोखलं. टवाळखोर जोडप्याच्या उद्देशून कमेंट्सही पास करत होते. (Viral video)

VAranasi Viral video
Viral Video: अरे देवा! गर्दीत गाडी चालवत लॅपटॉपवर करतोय काम; चक्रावून टाकणारा VIDEO

तर काहीजण 'इथून लवकर निघून जा', असंही सांगत होते. गंमत म्हणजे शेकडो लोकांचा जमाव असूनही कोणीही हस्तक्षेप करून या टवाळखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक देखील संताप व्यक्त करत आहेत. या प्रकरणी पोलीस काही कारवाई करणार का याकडे लक्ष आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com