Viral Video: अरे देवा! गर्दीत गाडी चालवत लॅपटॉपवर करतोय काम; चक्रावून टाकणारा VIDEO

Viral Video News: तरुण चक्क गर्दीमध्ये बाईक चालवत असताना लॅपटॉप उघडून काम करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Viral Video News:
Viral Video News:Saamtv

Viral Video News:

सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामधील काही व्हिडिओ इतके धक्कादायक अन् आश्चर्यचकित करणारे असतात की पाहणारही चक्रावून जातात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये एक तरुण चक्क गर्दीत गाडी चालवताना लॅपटॉप उघडून काम करत असल्याचे दिसत आहे.

सध्या स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, जगाच्या दोन पाऊल पुढे राहावे लागते. आयटी कंपनींमध्ये काम करणारे तरुण- तरुणींनाही बारा- बारा तास काम करावे लागते. मोठमोठ्या कंपनीत काम करणाऱ्यांना इतका वर्कलोड असतो की ते वैयक्तिक आयुष्यचं विसरुन जातात.

सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक चक्रावून टाकणारा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण चक्क गर्दीमध्ये बाईक चालवत असताना लॅपटॉप उघडून काम करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Video News:
Maharashtra Politics : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण गर्दीमध्ये स्कुटी चालवत चालवत लॅपटॉप उघडून ऑफिसची मिटींग अटेंड करताना दिसत आहे. दोन्ही पायांवर लॅपटॉप ठेऊन हा तरुण गर्दीमध्ये बाईकही चालवत आहे. त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रिनवर झूम मिटींग सुरू असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडिओ बेंगळोरमधील (Bengluru) असल्याचे सांगण्यात येत असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी हा नक्की आयटी कंपनीत काम करत असणार.. असा अंदाज वर्तवला आहे. तर अनेकांनी अशाप्रकारे जीव धोक्यात घालून काम न करण्याचा सल्लाही दिला आहे. (Latest Marathi News)

Viral Video News:
Maharashtra Lok Sabha Election : येत्या २४ तासात उत्तर द्या; शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com