Stone Pelting In Marriage : बाबो! लग्नात गरम पुरी न मिळाल्याने कुटाकुटी; दगडफेकीत ४ जण जखमी

Stone Throw in marriage For Puri: एका लग्नात टमटमीत फुगलेल्या आणि गरमागरम अशा पुऱ्यांवरून मोठा राडा झाला आहे.
Stone Pelting In Marriage
Stone Pelting In MarriageSaam TV

Jharkhand Crime News: लग्न समारंभात प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जेवण. प्रत्येक लग्नात पुरी आणि भाजी हा तर ठरलेला पदार्थ असतो. लग्नाच्या जेवणात जसं गुलाबजामुन आणि आइस्क्रिम खाण्यासाठी सर्वजण तुटून पडतात तसेच पुरी भाजीचे खवय्ये देखील फार आहेत. अशात एका लग्नात टमटमीत फुगलेल्या आणि गरमागरम अशा पुऱ्यांवरून मोठा राडा झाला आहे. (Crime News)

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमधील (Jharkhand) गिरिडीह या गावात ही घटना घडली आहे. मुफस्सिल पोलीस ठाणे हद्दीतील एका लग्नासमारंभात समोवारी मोठा गोंधळ झाला. लग्नात नवरा नवरीने एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालत आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात केली. त्यानंतर जेवणाच्या पंगती बसल्या.

Stone Pelting In Marriage
Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पती झाला हैवान; खलबत्याने मारहाण करत दिले गरम हिटरचे चटके

काही पंगती झाल्यावर मुलांची एक पंगत बसली. त्यावेळी आधीच करून ठेवलेल्या पुऱ्या थंड झाल्या होत्या. जेवण्यासाठी आलेल्या काही मुलांनी आम्हला गरमागरम पुऱ्या हव्यात असा हट्ट धरला. त्यावेळी मोठा गोंधळ झाला. त्यांच्यात आणि जेवण वाढऱ्या काही मुलांमध्ये गरम पुरीवरून बाचाबाची झाली.

दोन्ही गटातील मुलांनी एकमेकांना शिवीगाळ केली. नंतर या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटातील व्यक्तींनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या हाणामारीमध्ये ४ मुलांना जबर मार लागाला आहे. ते गंभीर जखमी असून जवळील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Stone Pelting In Marriage
Crime News : दुर्दैवी घटना! चहा विकून मुलाचं शिक्षण पूर्ण केलं; खर्चाला पैसे न दिल्याने मुलाने उचललं टोकाचं पाऊल

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. इथे आल्यावर संतप्त तरुणांना त्यांनी शांत केले. सदर घटनेत एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com