NEET 2023: अंतर्वस्त्रे काढून उलट घाला, ब्रा बदला; NEET परीक्षा केंद्रावरील धक्कादायक प्रकार

Crime News :येथे मुलींची अंतर्वस्त्रे तपासण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Crime News
Crime NewsSaam TV
Published On

NEET 2023: नीट परीक्षेदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. परीक्षा केंद्रांवर काही मुलींशी गैरवर्तन करण्याचा प्रकार घडला आहे. येथे मुलींची अंतर्वस्त्रे तपासण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षेला कोणत्याही विद्यार्थ्याने कॉपी करुनये त्यामुळे तपासणी करताना काही केंद्रांवर अशी वागणूक देण्यात आली आहे. (Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चंदीगड आणि पश्चिम बंगालच्या काही केंद्रांवर असा लाजिरवाणा प्रकार घडला आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांना आपली अंतर्वस्त्रे काढून ती कपड्यांवर घावलण्यास सांगितली. मुलींना देखील त्यांच्या ब्रा काढून तपासण्यात आले. परिक्षा केंद्राबाहेर आल्यावर मुलांनी आपल्या पालकांना ही माहिती सांगितली. त्यामुळे या प्रकरणी अनेकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Crime News
Mumbai-Goa Express Way Traffic Jam: मुंबई-गोवा महामार्गावर 1 तासापासून मोठी वाहतूक कोंडी; चाकरमान्यांचे हाल

NTA ने आपल्या गाइडलाईन्समध्ये परिक्षकांना विद्यार्थीनींना तपासण्यासाठी योग्या त्या सूचना दिल्या होत्या. रविवारी २ दशलक्षहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. ही नीट परीक्षा (NEET Exam) एकून ४,००० क्रेंद्रांवर घेण्यात आली. यावेळी असा प्रकार घडला आहे. काही पालकांनी आणि विद्यार्थ्यीनींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपले अनुभव शेअर करत याची माहिती दिली आहे.

मुलींच्या कपड्यामध्ये हात घालत ब्राचे पट्टे कसे काय तपासले जातात असा प्रश्न एका विद्यार्थीनीने विचारला आहे. सांगलीतील (कस्तुरबा वालचंद कॉलेज) या केंद्रावर देखील हा प्रकार घडला आहे. एका डॉ. महिलेने आपल्या मुलीसोबत येथे घडलेला प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, माझ्या मुलीला तेथे टॉप काढून तो उलट करुन घालण्यास सांगितला.

Crime News
Recruitment : खुश खबर! तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; महापालिकेत विविध पदासांठी भरती

अनेक पालकांनी आपल्या तक्रारीत असंही म्हटलं आहे की, परीक्षा केंद्रावर आजूबाजूला कपडे बदलण्यासाठी योग्य सोय नव्हती मोकळ्या मैदानात मुलींनी एकमेकींना घेरून आपले बदलले आहेत. यावेळी फक्त टॉप किंवा शर्ट नाही तर जिन्स देखील बदलण्यास सांगण्यात आलं होतं. सध्या सोशल मीडियावर (Social Media) या घटनेसाठी संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. पालकांनी यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com