Crime News : एका हातावर सुसाईड नोट, दुसऱ्या हातात विषाची बाटली; बॉयफ्रेंडचा नंबर पेनाने लिहून तरुणीची आत्महत्या

Viral News : प्रियकर लग्न करत नसल्याने एका तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने हातावर पेनाने सुसाईड नोट लिहिली. त्यात प्रियकराचा नंबर लिहून 'माझा मृतदेह या नंबरवर पाठवा' असे नोटमध्ये नमूद होते.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

Shocking News : प्रियकराचे लग्न ठरल्यानंतर एका तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने हातावर सुसाईड नोट लिहिली. त्यात माझ्या मृत्यूनंतर माझा मृतदेह हा पुढील नंबरवर पाठवा ही माझी अंतिम इच्छा असल्याचे तरुणीने नमूद केले होते. या घटनेची सोशल मीडियावर खूप चर्चा पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारच्या नालंदा जिल्ह्यामध्ये घडली आहे. तर आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव रिया गुप्ता असल्याचे म्हटले जात आहे. रियाचे तिच्या वहिणीच्या भावाशी प्रेमसंबंध होते. पण तिच्या प्रियकराचे दुसऱ्या मुलीशी लग्न ठरले. माझ्याशी लग्न कर अशी गळ रियाने तिच्या प्रियकराला घातली. यासाठी तिने विष पिऊन आत्महत्या करण्याचा दोनदा प्रयत्न केला.

रियाने आत्महत्या करताना हातावर सुसाईड नोट लिहिली. यात तिने एका नंबरचा उल्लेख केला. 'मला जगायची इच्छा होती. माझा मृतदेह या नंबरवर कॉल करुन पाठवून द्या हीच माझी शेवटची इच्छा आहे. आय लव्ह यू माय जिंदगी' असे रियाने तिच्या डाव्या हातावर पेनाने लिहिले होते. तो नंबर रियाच्या प्रियकराचा असल्याचे म्हटले जात आहे.

Crime News
Tragedy News : दहावीच्या परीक्षेसाठी मुलीला शुभेच्छा दिल्या, बस स्टॉपवरच वडिलांचा हार्ट अटॅकनं मृत्यू

दोन दिवसांपूर्वी रियाने तिच्या प्रियकराच्या घराजवळ आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिने विषप्राशन केले होते. त्यानंतर रियाच्या प्रियकराने तिला रुग्णालयात दाखल केले होते. उपचारांनंतर तिला घरी सोडण्यात आले. त्यानंतर रागाच्या भरात रियाने पुन्हा एकदा स्वत:चा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

Crime News
Bhiwandi News : रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून भिवंडीच्या खासदारांची फसवणूक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com