Corona Virus: चिंता वाढली! देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, आठवडाभरात २ हजारांपार रुग्ण; १५ जणांचा मृत्यू

Corona Surge in India: राज्यासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशाभरात सध्या २ हजारांपार रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत १५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे चिंता वाढली आहे.
Corona Virus:  चिंता वाढली! देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, आठवडाभरात २ हजारांपार रुग्ण; १५ जणांचा मृत्यू
Corona Virus
Published On

कोरोनाने पुन्हा जगाची चिंता वाढवली आहे. भारतात देखील कोरोनाने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. देशभरात कोरोनाच्या रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या एका आठवड्यात देशभरात २ हजारांहून अधिक सक्रिय रूग्णांची नोंद झाली आहे. देशामध्ये केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. रुग्णालयांमध्ये बेडसह वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देशात कोरोना व्हायरसचे एकूण २७१० सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत ५११ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. २५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात आतापर्यंत १५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सर्वाधिक ६ मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. जानेवारी २०२५ पासून, ११७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ८४ नवीन रुग्ण आढळले, तर राजस्थानमध्ये २४ तासांत १५ नवीन रुग्ण आढळले.आतापर्यंत आढळेल्या बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.

Corona Virus:  चिंता वाढली! देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, आठवडाभरात २ हजारांपार रुग्ण; १५ जणांचा मृत्यू
Corona: ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी COVID-19 पासून कसा करावा बचाव? या गोष्टी अवश्य पाळा

दिल्ली-एनसीआरमधील आकडेवारीनुसार, आतापर्यंत दिल्लीत २०० हून अधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी गुरुग्राममध्ये ३ नवीन रुग्ण आढळले. गेल्या १० दिवसांत शहरात १६ कोरोना बाधित रुग्ण आढळले. राजधानी दिल्लीतील कोरोना संसर्गाबाबत मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले होते की, दिल्लीतील रुग्णालयात १९ कोविड रुग्ण दाखल आहेत काळजी करण्याची गरज नाही.

Corona Virus:  चिंता वाढली! देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, आठवडाभरात २ हजारांपार रुग्ण; १५ जणांचा मृत्यू
Corona Update : आषाढी वारीवर कोरोनाचं संकट, सोलापुरात २ रुग्णांची नोंद; प्रशासनाचं नियोजन काय?

दिल्लीत कोरोना रुग्णाच्या मृत्यूची पहिली घटना घडली. एका ६० वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला. दिल्ली-नोएडा-गाझियाबादमध्येही कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. दिल्लीत एका दिवसांत ५६ नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीतील सक्रीय रुग्णांची संख्या २०० च्या वर गेली आहे. केरळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७२७ वर पोहोचली आहे. गेल्या एका आठवड्यात येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये कोविड रुग्णांमध्ये वाढ होत असताना देशात चार नवीन प्रकार आढळून आले आहेत.

Corona Virus:  चिंता वाढली! देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, आठवडाभरात २ हजारांपार रुग्ण; १५ जणांचा मृत्यू
Corona Virus: कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचा आणखी एक बळी, ५७ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com