कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय. कल्याण-डोंबिवलीमधील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. डोंबिवलीमधील ५७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या व्यक्तीवर कळवा रुग्णालयामध्ये गेल्या सहा दिवसांपासून उपचार सुरू होते.
आज सकाळी उपचारादरम्यान कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी ४७ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कल्याण-डोंबिवलीमध्ये सध्या दोन कोरोना रुग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनाने कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांची चिंता वाढवली आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाने टेन्शन वाढले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कल्याण- डोंबिवलीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ५ रुग्ण सापडले होते. यामधील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर उर्वरीत ३ पैकी दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एक रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिकेकडून उपाययोजना केली जात आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, हात सतत धुवावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून केले जात आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाने टेन्शन वाढले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कल्याण- डोंबिवलीमध्ये कोरोनाचे ५ रुग्ण सापडले होते. यामधील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर उर्वरीत ३ पैकी दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एक रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिकेकडून उपाययोजना केली जात आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, हात सतत धुवावेत असे आवाहन पालिकेकडून केले जात आहे.
देशभरात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता छत्रपती संभाजीनगरमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढली तर तातडीने उपचार करता यावेत यासाठी सर्व सोयीसुविधा युक्त असा साडेतीनशे खाटांचे कोविड रुग्णालय सज्ज करण्यात आले आहे. त्यात ऑक्सिजन सिलेंडर, आयसीयू बेड, लहान मुलासाठी विशेष व्यवस्था, औषधांचा पुरेसा साठा, वैद्यकीय मनुष्यबळ अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र सध्या संभाजीनगरमध्ये कोणताही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.
नागपुरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. घाबरण्याची गरज नसली तरी काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. बदलत्या वातावरणामुळे सध्या सर्दी खोकला ताप घसा दुखणे, खवखवणे असे लक्षणे दिसत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन केले जात आहे. ४८ तासानंतर अशाच पद्धतीचे लक्षण दिसत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचण्या करून घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. मे महिन्यात नागपुरात सात रुग्ण आढळून आले होते त्यापैकी पाच रुग्ण हे पूर्णतः बरे झालेले आहे.
देशामध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १००० पार गेला आहे. देशात सध्या १००९ सक्रीय कोरोना रुग्ण आढळले असून यामधील ७५२ नवे रुग्ण आताच समोर आले आहेत. देशभरात १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोनाचे सर्वाधिक ४३० रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात २०९, दिल्लीत १०४, कर्नाटकमध्ये ४७ रुग्ण आढळले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.