
भारतासह जगभरात २०२० ते २०२२ या दोन वर्षांत काळ बनून आलेल्या कोरोनाची (covid 19 Virus) लाट ओसरली असं वाटत असेल तर आताच सावध व्हा! इतर संसर्गजन्य आजारांसोबत जीवघेण्या कोरोनासोबत जगण्याची सवय आता लावून घ्यावी लागेल असे दिसते. हाँगकाँगपासून सिंगापूरपर्यंत कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाची लाट येतेय का अशीच शंका आकडेवारीवरून वाटते. वाढती रुग्णसंख्या ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा आहे, असं मानलं जात आहे.
गेल्या वर्षभराच्या तुलनेत मे मध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढतो आहे. हाँगकाँगमध्ये महिन्याच्या सुरुवातीलाच जवळपास ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हाँगकाँगसह सिंगापूरसाठी अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. तेथील नागरिकांना कोविड गाइडलाइन्सचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जगभरात कोरोना हळूहळू डोकं वर काढत आहे. कोरोना झपाट्याने फैलावतोय. आशियात कोरोनाने दबक्या पावलांनी प्रवेश केला आहे. ही नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. कोविड १९ बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य अधिकारीही चिंतेत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येने कोरोना लाटेचे संकेत दिले आहेत, असे बोलले जात आहे.
कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सिंगापूरमध्ये अलर्ट जारी केला आहे. कोरोनाबाबत वर्षभरात पहिल्यांदाच तेथील आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. याबाबतची आकडेवारीच प्रसिद्ध केली आहे. मे महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात १४२०० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट आधीच्या पेक्षा घातक आहे, असं सांगण्यात येत असलं तरी, त्याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही.
कोरोनाचा नवा सबव्हेरियंट जेएन १ (JN.1) बीए.2.86 चाच उपप्रकार आहे. देशासाठी हा व्हेरियंट नवीन असला तरी, जगभरात या व्हेरियंटचा संसर्ग झालेले रुग्ण देखील आढळले आहेत. जागतिक पातळीवरचा विचार केला तर, या व्हेरियंटची लागण झालेला पहिला रुग्ण यावर्षाच्या जानेवारीत आढळला होता. त्यानंतर तो अमेरिका, युरोपीय देश, सिंगापूर, चीन आदी देशांत संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत, असे सांगितले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.