Corruption Index 2023 : सर्वाधिक भ्रष्टाचारी १८० देशांची लिस्ट जाहीर, यादीत भारताचाही सामावेश; टॉप ५ मध्ये कोणते देश?

Corruption Index Update: भ्रष्टाचार निर्देशांक २०२३ अहवालात १८० देशांची यादी आहे. या यादीत भारताचा ९३ वा क्रमांक आहे. गेल्या वर्षीच्या अहवालाच्या तुलनेत यंदाच्या अहवालात भारतातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणात फारसा बदल झाला नसल्याचे समोर आले आहे.
Buldhana Bribe Trap
Buldhana Bribe TrapSaam tv
Published On

Corruption Index 2023 :

भ्रष्टाचार निर्देशांक २०२३ हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात १८० देशांची यादी आहे. या यादीत भारताचा ९३ वा क्रमांक आहे. गेल्या वर्षीच्या अहवालाच्या तुलनेत यंदाच्या अहवालात भारतातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणात फारसा बदल झाला नसल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

भ्रष्टाचाराचे प्रमाण कसं सिद्ध करतात?

भ्रष्टाचार निर्देशांकाचा अहवाल ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणावर अहवाल सादर करण्यात येतो. तज्ज्ञांच्या मदतीने अहवाल सादर केला जातो.

भ्रष्टाचाराचे प्रमाण सिद्ध करण्यासाठी शून्य ते शंभर या दरम्यान गुणांक दिले जातात. शून्य गुणांक असेल तर सर्वात कमी भ्रष्टाचार समजला जातो. तर शंभर गुणांक असेल तर अत्यंत भ्रष्टाचारी देश समजला जातो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana Bribe Trap
Pakistan Election 2024: देश आर्थिक संकटात; नवाझ शरिफांनी प्रचारात घातली 1 लाखाची कॅप, लोक म्हणाले...

भारताला २०२३ मध्ये ३९ गुणांक मिळाले होते. तर २०२२ मध्ये ४० गुणांक मिळाले होते. २०२२ साली भारताचा क्रमांक ८५ होता. तर २०२३ साली ९३ वा क्रमांक आहे.

Buldhana Bribe Trap
Rahul Gandhi on Nitish Kumar: नितीश कुमारांच्या भूमिकेवर राहुल गांधी मनातलं बोलले, भरसभेत जोक सांगितला

पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तान आणि श्रीलंकेचाही या यादीत सामावेश आहे. या देशांचा अनुक्रमे १३३ आणि ११५ व्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही देशांवर कर्जाचा बोझा आहे. या काळातही श्रीलंका त्यांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. या यादीत बांगलादेश १४९ व्या क्रमांकांवर आहे. तसेच चीनचा ७६ वा क्रमांक आहे.

Buldhana Bribe Trap
Shocking News :गाढ झोपेत असताना झोपडीतून खेचून नेलं, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात १ वर्षीय बाळाचा मृत्यू

पीएम मोदींच्या कार्यकाळात भ्रष्टाचार कमी झाला नाही - रिपोर्ट

मीडिया रिपोर्टनुसार, २००५ ते २०१३ पर्यंत यूपीए सरकार आणि एनडीए सरकारची भ्रष्टाचारावरून तुलना केली तर खास सुधारणा झाल्या नाहीत. २००६ ते ०७ च्या काळात काही प्रमाणात भ्रष्टाचाराचं कमी झालं. त्या काळात भारताचा क्रमांक ७० वा आणि ७२ वा होा.

यूपीए सरकारच्या काळात २०१३ मध्ये भारत देश ९४ स्थानावर घसरला. तर दुसरीकडे एनडीएच्या कार्यकाळात २०१५ सालात कार्यकाळ सुधारला. त्यावेळी भारत ७६ व्या क्रमांकावर पोहोचला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com