Corona Virus Update: सावधान, सावधान; कोरोनाचा NB.1.8.1 व्हेरियंट सर्वोत जास्त धोकादायक, WHO कडून मार्गदर्शक सूचना जारी

Corona Virus: जगभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढू लागलेत. भारतातही त्याच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे. कोरोनाचे अनेक नवीन प्रकार समोर आले आहेत.
Corona Virus Update
Corona Virus
Published On

कोरोना या संसर्गामुळे पुन्हा एकदा जगात कहर माजवलाय. अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, थायलंडसह भारतातही कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढू लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोविडच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली जातेय.

अनेक देशांमध्ये कोरोनाचे नवीन प्रकार वेगाने पसरत आहेत. सध्या परिस्थिती गेल्या वेळेइतकी भयानक नाही. तरीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या नवीन व्हेरियंटबद्दल काय म्हटले आहे. आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

Corona Virus Update
Corona Deaths : कोरोनाचे देशात 13 मृत्यू, कोरोना रुग्णसंख्या 1 हजार पार

नव्या व्हेरियंटबाबत WHO चा इशारा

कोरोनाचे अनेक नवीन प्रकार उदयास येत असल्याचे WHO ने म्हटलंय. यामध्ये NB.1.8.1, JN.1 आणि KP.2 सारखे प्रकार समाविष्ट आहेत, जे ओमिक्रॉनचे उप-प्रकार आहेत. NB.1.8.1 व्हेरियंट चीन, अमेरिका आणि काही युरोपीय देशांमध्ये ते वेगाने पसरतोय. त्याचवेळी, भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाच्या दोन्ही उप-प्रकार NB.1.8.1 आणि LF.7 च्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ झालीय. यामुळे, भारतात संसर्गात झपाट्याने वाढ नोंदवली गेलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com