Corona Deaths : कोरोनाचे देशात 13 मृत्यू, कोरोना रुग्णसंख्या 1 हजार पार

Corona News : कोरोनामुळे पुन्हा मृत्यूचं तांडव होण्याची भीती यंत्रणांना सतावू लागलीय... कारण भारतात कोरोनाबळींची संख्या वाढायला लागलीय... देशात आणि राज्यात नेमके किती कोरोनाबळी गेलेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Corona
Coronax
Published On

देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केलीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं अनेकांची धाकधुक वाढलीय. देशात आतापर्यंत 13 रुग्णांचा मृत्यू झालाय. यापैकी महाराष्ट्रात 6 जणांचा मृत्यू झालाय. देशात कोरोना रुग्णसंख्येनं 1 हजारांचा टप्पा पार केलाय. मात्र देशात कुठे किती कोरोना रुग्ण आढळून आलेत? पाहूयात...

Corona
Vaishnavi Hagawane : वैष्णवीसोबत चॅट करणारा 'तो' कोण? आरोपींच्या वकिलांनी दिली मोठी माहिती

कोरोना वाढतोय, मास्क लावा-

केरळ 430 रुग्ण

महाराष्ट्र 208 रुग्ण

दिल्ली 104 रुग्ण

गुजरात 83 रुग्ण

कर्नाटक 47 रुग्ण

भारतात कोविड-१९ चे ४ नवीन प्रकार आढळलेत. यात LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 कोरोना प्रकारांचा समावेश आहे. NB.1.8.1 चे A435S, V445H आणि T478I सारखे इतर प्रकार वेगाने पसरत आहेत. नव्या व्हेरिएंटच्या प्रसारामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी आहे. मात्र सहव्याधी असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी.

Corona
Shocking : पूजेच्या निमित्ताने घरात आला; तरुणीला धमकावून पळवून घेऊन गेला, आश्रमात ३ दिवस लैंगिक अत्याचार अन्...

यासाठीच मुंबई महापालिका रुग्णालयात कोरोनावरील उपचाराला सुरुवात झालीय. सेव्हन हिल्स रुग्णालयात 100 खाटा कोरोना रुग्णांसाठी तयार ठेवल्या आहेत. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आलीय. तिथे सर्व सोयीसुविधा युक्त असा साडेतीनशे खाटांचे कोविड रुग्णालय सज्ज करण्यात आले आहे. त्यात ऑक्सिजन सिलेंडर, आयसीयू बेड, लहान मुलासाठी विशेष व्यवस्था, औषधांचा पुरेसा साठा, वैद्यकीय मनुष्यबळ अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Corona
वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची, चॅट करणाऱ्या व्यक्तीने त्रास दिल्याने आत्महत्या केली असावी; हगवणेंच्या वकिलांचा खळबळजनक दावा

कोरोना रुग्णसंख्या जरी वाढली असली तरी नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळेच आता कोरोना तुमचं दार वाजवण्याआधी तुम्ही काळजी घेऊन कोरोनाला दूर ठेवा..

Corona
Ajit Pawar : साखर कारखान्याच्या मैदानात 'दादा', बारामतीत वर्चस्वासाठी नवी खेळी? अजित पवार घेणार पराभवाचा बदला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com