India Covid Update: देशात कोरोनाचा धोका कायम; गेल्या २४ तासांत नवे रुग्ण ९ हजार पार, २७ जणांचा मृत्यू

Corona in India: देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ९,१११ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
corona in india
corona in india SAAM TV
Published On

New Delhi: देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ९,१११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर काल कोरोनाचे १०, ०९३ रुग्ण नवीन रुग्ण आढळून आले होते. दोन दिवसांच्या तुलनेत आज कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले आहे. (Latest Marathi News)

देशात कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. देशात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट ८.४० टक्के आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या ६०,३१३ इतकी झाली आहे. तर कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर ९८.६८ टक्के आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढताना दिसून येत आहे. देशातील अनेक राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या देखील वाढत आहे.

corona in india
Karnataka Election 2023 : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा भाजपला रामराम, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

गेल्या २४ तासांत कोरोनामुळे २७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ५,३१,१४१ इतकी झाली आहे. तर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ६० हजार पार पोहोचली आहे.

मे महिन्यात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता

कानपूर आयआयटीचे प्रोफेसर मणींद्र अग्रवालने दावा केला आहे की, 'मे महिन्याच्या मध्यात कोरोना रुग्णात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. तेव्हा दिवसाला ५० हजाराहून अधिक रुग्ण आढळण्याची शक्यता आहे'.

corona in india
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात वेगवान हालचाली! भाजपचे 2 मोठे नेते तडकाफडकी दिल्लीला रवाना

दिल्लीत रविवारी आढळले १६३४ रुग्ण

राजधानी दिल्लीत कोरोनाच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे . रविवारी दिल्लीत १६३४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच रविवारी दिल्लीत कोरोनाने तीन जणांचा मृत्यू झाला आहे . राजधानी दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या ५२९७ इतकी झाली आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी दिल्लीत ३१.९ टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे. रविवारी १, ३९६ रुग्ण आढळले आहेत. १५ महिन्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com