अहमदाबाद : कोरोनाने Corona आपण खूप दिवसांपासून आपण लॉक Lock झालो आहोत. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप Laptop हे आता काय ते आपळेच विश्व झाले आहे. फिरण्याचा आनंद तर आपल्या सध्याच्या घडीला घेता येत नाही. असो पण घरबसल्या देखील निसर्गाचा अद्भुत नजारा बघण्याची संधी मात्र, बिलकुल सोडू नये. असाच एक गुजरात मध्ये सुंदर फोटो Photo आणि व्हिडिओ Video तुम्हाला सध्या समोर आलेला बघत आहे.
ज्यामध्ये एकाच वेळी हजारो हरण एकत्र एकाच रांगेत धावताना आपल्याला दिसत आहे. भावनगरच्या वेलावदार Velavadar मध्ये राष्ट्रीय मृग अभयारण्यामधील फोटो आणि व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जिथे एकाच वेळी हजारो हरणं एकत्र पाहायला मिळाली आहेत. हे दृश्यं मनाला भावणारं असे आहे. या अभयारण्यात आणि बाहेरील क्षेत्रात अशी एकूण ७५०० पेक्षा जास्त हरणं आहेत.
हे देखील पहा-
हरणांच्या कळपांचे दर्शन इथे अधूनमधून होत असताना आपल्या पाहायला मिळेल. पण हरणांचा असा कळप मात्र, तुम्हाला क्वचितच बघायला मिळणार आहे. रस्ताच्या या बाजूवरून त्या बाजूला जाणारी ही हरणं. रस्ता ओलांडताना दुडूदुडू पळत आहेत. जंंगलात किंवा नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेल्यावर एखादा वाघ, सिंह, बिबट्या असे प्राणी बघायला मिळावेत असे वाटतं असत.
पण सुंदर आणि गोंडस हरणांकडेही देखील आपल्या नजरा टिकून असतात. अशी १-२ हरणं जरी दिसली तरी मनाला कसे प्रसन्न वाटतं असते. मग असा हरणांचा कळप बघितलं तर मग तर काय विचारूच नकाच. या हरणांना असे पळताना बघून एखादी लाटच आली असे दिसतं आहे. ही लाट बघितल्यानंतर तुमच्या मनामधील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती मात्र, नक्कीच दूर झालेली असणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.