ऑफिस आम्हाला परत द्या! काँग्रेस कार्यकर्त्यांचा BRSच्या कार्यालयावर हल्ला; खुर्च्या, फर्नीचरला लावली आग

Congress Workers Attack BRS Office: तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनुगुरु येथील बीआरएस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केल्याची घटना घडलीय. कार्यकर्त्यांनी फर्निचर आणि खुर्च्या पेटवून दिल्या. दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू झाल्याने तणाव वाढला.
Congress Workers Attack BRS Office
Congress workers vandalize and set fire to BRS party office furniture in Manuguru, Khammam district, Telangana.saamtv
Published On
Summary
  • काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीआरएस कार्यालयावर हल्ला केला.

  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

  • खम्मम जिल्ह्यातील बीआरएस कार्यालयावर हल्ला

तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील मनुगुरु भागात एक धक्कादायक घटना घडलीय. अहिंसेवर विश्वास ठेवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्री समितीच्या कार्यालयावर हल्ला केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीआरएसच्या कार्यालयातील फर्नीचर बाहेर काढत त्याला पेटवून दिलं. याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे झेंडे हातात धरून लोक बीआरएस कार्यालयात प्रवेश करत घोषणाबाजी करत आहेत. यादरम्यान दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आणि काही लोक जखमी झालेत .

"आमचे कार्यालय आम्हाला परत द्या" अशी मागणी करत घोषणाबाजी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसक निर्दशने केली. याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर आग आटोक्यात आणली. मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आलेत. बीआरएसच्या राजवटीत त्यांचे कार्यालय जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आलं होतं, असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दावा केलाय. तत्कालीन आमदाराने पोलीस संरक्षणात काँग्रेस कार्यालय ताब्यात घेतले होते. त्यानंतर बीआरएसला गुलाबी रंग देण्यात होता. "आम्ही ते ऑफिस परत घेऊ." असं काँग्रेस कार्यकर्ते म्हणत आहेत.

Congress Workers Attack BRS Office
Nepal Politics: सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू; पंतप्रधानांनी बोलवली राजकीय पक्षांची बैठक

या घटनेनंतर बीआरएसने काँग्रेसवर हिंसाचाराचा आरोप केलाय. काँग्रेस म्हणजे दबाव आणि दडपशाही आहे. जर अशा गुंडगिरीने जनतेला दडपण्याचा प्रयत्न केला. तर जनता काँग्रेस नेत्यांना उत्तर देईल." बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव (केटीआर) यांनी हे सध्याच्या काँग्रेस सरकारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अपयशाचे आणि गुंडगिरीचे उदाहरण असल्याचं म्हटलंय. बीआरएस कुटुंबातील ६० लाख कार्यकर्ते मनुगुरुंच्या पाठीशी उभे आहेत. काँग्रेसच्या गुंडांना घाबरण्याची गरज नसल्याचं अध्यक्ष केटी रामा राव म्हणालेत.

Congress Workers Attack BRS Office
Tragic Accident : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; भरधाव टूरिस्ट बसची ट्रकला धडक, १८ भाविकांचा मृत्यू

दरम्यान जुलै २०२० मध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाचे माजी कार्यालय बीआरएस कार्यालयात रूपांतरित करण्यात आलं, तेव्हा हा मुद्दा उघडकीस आलाय. काँग्रेसचे आमदार रेगा कांता राव बीआरएसमध्ये सामील झाले. त्यानंतर ते कार्यालय बीआरएसचे झालं. सीएलपी नेते भट्टी विक्रमारका यांनी २०२० मध्ये या मुद्द्यावर मनुगुरुमध्ये निषेध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com