काँग्रेस शहरी नक्षलवादी पक्ष चालवत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीं होती. यावर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्युत्तरात खरगे यांनी भाजपला दहशतवाद्यांचा पक्ष म्हटले. पंतप्रधान मोदींनी ५ ऑक्टोबरला काँग्रेसवर शहरी नक्षलवाद्यांचे नियंत्रण असल्याचे म्हटले होते.
काँग्रेसच्या धोकादायक अजेंडाचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सगळ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केलं होतं. यावर आता मल्लिकार्जुन खरगे यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या टीकेला उत्तर देताना खरगे म्हणाले, "मोदी काँग्रेसला नेहमीच शहरी नक्षलवादी पक्ष म्हणतात. ही त्यांची सवय आहे. पण त्यांच्याच पक्षाचे काय? भाजप हा दहशतवाद्यांचा पक्ष आहे, जो लिंचिंगमध्ये गुंतलेला आहे. मोदींना कोणताही अधिकार नाही. असे आरोप करण्याचा."
महाराष्ट्रात एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, “काँग्रेसची संपूर्ण इकोसिस्टम, शहरी नक्षलवाद्यांची संपूर्ण टोळी... जनतेची दिशाभूल करण्यात व्यस्त होती. पण त्यांचे सर्व कट उद्ध्वस्त झाले. त्याने दलितांमध्ये खोटे पसरवण्याचा प्रयत्न केला. पण दलित समाजाला त्याचे घातक हेतू कळले. हरियाणातील दलित वर्गाने भाजपला विक्रमी पाठिंबा दिला.''
मोदी म्हणाले होते की, ''शेतकरी आणि तरुणांना भडकवण्यात त्यांनी कोणतीही सर सोडली नाही. मात्र हरियाणाच्या जनतेने दाखवून दिले आहे की ते यापुढे काँग्रेस आणि शहरी नक्षलवाद्यांच्या द्वेषपूर्ण कारस्थानाला बळी पडणार नाहीत.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.