Congress President: काँग्रेसला लवकरच मिळणार नवे अध्यक्ष, कोण मारणार बाजी?

आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु
rahul gandhi
rahul gandhi saam tv
Published On

Congress President Election: काँग्रेस (Congress) अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे.अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज दाखल करता येणार आहेत. मुख्य म्हणजे काँग्रेसला आता गांधी घराण्याबाहेरचा व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सध्या 2 नावे चर्चेत असून ते निवडणूक लढवणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, दोन-तीन दिवसांत अध्यक्षपदासाठी कोण आपला दावा मांडणार आणि कोण बाजी मारणार, हे स्पष्ट होणार आहे.

rahul gandhi
लातुरात भूकंपाचे तीन सौम्य धक्के; नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन

काँग्रेस अध्यक्षपदासाठी दावेदार कोण ?

सध्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांबद्दल बोलायचे झाले तर केवळ दोनच नावे चर्चेत आहे. यामध्ये पहिलं नाव आहे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे तर दुसरे नाव शशी थरुर (Shashi Tharoor) यांचे आहे. यामध्ये अशोक गेहलोत यांचं पारड जड असल्याचे बोलले जात आहे. गेहलोत यांनी याबाबत प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, पक्षश्रेष्ठींनी आपल्याला जी जबाबदारी दिली आहे, ती आपण पार पाडू. त्याचवेळी,शशी थरुरू यांचे नाव दुसरे उमेदवार म्हणून चर्चेत आहे. दरम्यान मनीष तिवारीही अध्यक्षपदासाठी फॉर्म भरू शकतात, अशी चर्चा आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी बऱ्याच चढाओढीनंतर अखेर निवडणुकीची वेळ आली आहे. एकीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) अध्यक्षपदासाठी लढणार नसल्याचे वारंवार स्पष्ट करत असताना दुसरीकडे सोनिया गांधीही प्रकृतीच्या कारणामुळे या पदापासून दूर आहेत. पक्षाच्या भल्यासाठी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला अध्यक्ष करण्याची मागणी सातत्याने होत होती. आता तारखा जाहीर झाल्यामुळे काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड मतदानाद्वारे होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली आहे. आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून ती ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवडणूक प्राधिकरण मतदानावर देखरेख करेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. तर 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसला लवकरच मिळणार नवे अध्यक्ष मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com