Rahul Gandhi: काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांना मोठी आश्वासनं; राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिली MSPकायद्यासह ५ गॅरंटी

Rahul Gandhi 5 guarantee: पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे राहुल गांधी यांनीदेखील गॅरंटी शब्दाचा वापर करत आहेत. त्यामध्ये महालक्ष्मी गॅरंटी, युवा गॅरंटी, नारी न्याय गॅरंटी, किसान न्याय गॅरंटी यांचा समावेश आहे
Rahul Gandhi: काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांना मोठी आश्वासनं; राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिली MSPकायद्यासह ५ गॅरंटी

Rahul Gandhi 5 Guarantees To Farmers :

देशात लोकसभा निवडणुकांची वारे जोर जोरात वाहू लागली आहेत. प्रत्येक पक्ष मतदारांना मोठं मोठी आश्वसने देत आहे. लोकसभेचं मैदान मारण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसलीय. महिला,तरुण आणि शेतकऱ्यांना वेगवेगळी आश्वासने पक्षाकडून देण्यात येत आहेत. नुकतेच काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना ५ गॅरंटी दिल्यात.या गॅरंटींमध्ये शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त केलं जाईल,अशीही सांगितलंय. (Latest News)

पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे राहुल गांधी यांनीदेखील गॅरंटी शब्दाचा वापर करत आहेत. त्यामध्ये महालक्ष्मी गॅरंटी, युवा गॅरंटी, नारी न्याय गॅरंटी, किसान न्याय गॅरंटी यांचा समावेश आहे.देशात काँग्रेस सरकार आली तर शेतकऱ्यांना काय देणार याची माहिती काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत दिलीय. देशातील सर्व अन्नदात्यांना माझा नमस्कार काँग्रेस पक्ष तुमच्यासाठी ५ अशा गॅरंटी देत आहे, ज्या तुमच्या सर्व समस्या संपवून टाकतील, असं राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेसचं सरकार बनल्यानंतर एमएसपीच्या स्वामीनाथन आयोगाच्या फॉर्म्युला अंतर्गत कायद्याचा दर्जा देण्यात येईल. यासोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि कर्जमाफीची रक्कम निश्चित करण्यासाठी कायमस्वरूपी 'कृषी कर्जमाफी आयोग' स्थापन केलं जाईल, असं आश्वासनही राहुल गांधी यांनी दिलंय. त्याचबरोबर विमा योजनेत बदल करून पिकाचे नुकसान झाल्यास ३० दिवसांच्या आत थेट बँक खात्यात नुकसान भरपाईचे पैसे टाकले जातील, अशी गॅरंटीही राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये दिलीय.

तसेच काँग्रेसकडून देण्यात आलेल्या ५ गॅरंटींमध्ये आयात-निर्यातवर धोरण तयार केली जाईल, असंही सांगितलंय. जर काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर कृषी साहित्यावरील जीएसटी रद्द केली जाईल. कष्ट आणि मेहनतीने शेती फुलवणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन सुखी आणि आनंदी व्हावे असं काँग्रेसचं उद्दिष्ट असल्याचं राहुल गांधी म्हणालेत.

राज्यातील धुळे जिल्ह्यात भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संबोधन करताना राहुल गांधी यांनी महिला न्याय गॅरंटी योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या अंतर्गत गरीब महिलांना १ लाख रुपये, सरकारी नोकरीमध्ये ५० टक्के आरक्षण आणि महिला वसतिगृहाची सुविधा देण्याचे आश्वासन दिले. काँग्रेस महिला न्याय हमी जाहीर करत आहे. याअंतर्गत पक्ष देशातील महिलांसाठी नवा अजेंडा ठरवणार असल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते.

Rahul Gandhi: काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांना मोठी आश्वासनं; राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिली MSPकायद्यासह ५ गॅरंटी
Bharat Jodo Yatra : भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त राहुल गांधी उद्या धुळ्यात; आमदार पाटलांकडून आढावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com