Congress President Election : कॉंग्रेस अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शशी थरूरही निवडणूक लढणार

केरळचे खासदार शशी थरूर देखील उतरणार असल्यानं निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे
Congress President Election News
Congress President Election Newssaam tv
Published On

शिवाजी काळे

Congress President Election News : कॉंग्रेस (Congress) अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उतरले आहेत. तसेच केरळचे खासदार शशी थरूर (shashi tharoor) देखील उतरणार असल्यानं निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. थरूर यांनी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडे अर्जाची मागणी केली आहे. मात्र, फक्त अशोक गेहलोत आणि शशी थरूरच नाही तर कॉंग्रेसमध्ये अनेक जण निवडणूक लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Congress President Election News
Congress President: काँग्रेसला लवकरच मिळणार नवे अध्यक्ष, कोण मारणार बाजी?

अनेक राज्यांच्या काँग्रेसच्या वर्कींग कमिटीने राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावं या मागणीचे ठराव मंजूर केले आहेत. मात्र, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी साफ नकार दिल्यानं राहुल गांधी हे अध्यक्ष होणार नाही हे स्पष्ट होते.

राहुल गांधी नाही तर मग कोण?

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कॉंग्रेसचे अध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करणार आहेत. त्याचबरोबर शशी थरूर देखील निवडणूक अर्ज दाखल करणार आहे. तर दुसरीकडे पंजाबमधील काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, मल्लिकार्जून खर्गे, मुकुल वासनिक, भूपिंदर सिंग हुड्डा, पृथ्वीराज चव्हाण याचं नाव देखील चर्चेत आहेत.

Congress President Election News
Akola: राहुल गांधी यांनीच कॉंग्रेसचे अध्यक्ष व्हावे; नाना पटोले काय म्हणाले, वाचा...

कधी होणार निवडणूक?

निवडणुकीची अधिसूचना - २२ सप्टेंबर

उमेदवारी अर्ज भरणे - २४ ते ३० सप्टेंबर

अर्जांची छाननी - १ ऑक्टोबर

अर्ज माघारी घेण्याची मुदत - ८ ऑक्टोबर

मतदान - १७ ऑक्टोबर

मतमोजणी - १९ ऑक्टोबर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com