VOTE चोरी कशी झाली? १४ मिनिटांत १२ मते कशी काढली? राहुल गांधींनी थेट पुरावाच दाखवला | VIDEO

Congress Leader Rahul Gandhi: राहुल गांधींनी मतचोरीप्रकरणी पुरावे सादर केले आणि काँग्रेसच्या मतांवर टार्गेट केल्याचा आरोप केला.
Congress Leader Rahul Gandhi
Congress Leader Rahul GandhiSaam
Published On
Summary
  • दिल्लीतील इंदिरा भवन येथे राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली.

  • त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मतचोरीप्रकरणी पुरावे सादर केले.

  • काँग्रेसच्या मतांना डिलिट करून टार्गेट केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

  • १४ मिनिटांत १२ मते डिलिट झाली, माझ्याकडे १००% पुरावे आहेत, असा दावा राहुल गांधींनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी मतचोरीप्रकरणी आक्रमक झालेत. त्यांनी आज दिल्लीतील इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मतचोरीप्रकरणी विविध पुरावे सादर केले. व्होटचोरी कशी झाली? याचा थेट व्यक्तीसह पुरावे सादर केले. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध प्रकरणे समोर आणली. कर्नाटकमध्ये मत चोरी करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा धक्कादायक आरोप राहुल गांधींनी केला आहे.

१४ मिनिटांत १२ मते काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या नंबरवर दोन फॉर्म भरण्यात आले, असं राहुल गांधी म्हणाले. ३६ सेकंदात फॉर्म भरला अन् जमा केला गेला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मते वगळले गेली, असं राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस, विरोधकांची मते डिलिट केली जात आहे. माझ्याकडे १०० टक्के पुरावे आहेत, कर्नाटकमध्ये आनंद येथे ही चोरी पकडण्यात आली, असे राहुल गांधी म्हणाले. ज्यांचे नावे डिलिट झाली, त्यांना काही माहितीच नाही, असेही ते म्हणाले.

Congress Leader Rahul Gandhi
आभाळ फाटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पुरात २२ जणांचा मृत्यू, १५ जण अजूनही बेपत्ता

कर्नाटकमध्ये ६ हजारहून जास्त मते मिळाली, यापेक्षा जास्तही असू शकतात. कर्नाटकमधील नंबर नव्हतेच, दुसरीकडून मते डिलिट केली जात आहेत. काँग्रेस मतांना टार्गेट केले जातंय. गोदाबाई यांच्या नावावर १२ मते डिलिट करण्यात आली. त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हते, असंही राहुल गांधी म्हणाले.

Congress Leader Rahul Gandhi
चकमकीत आरोपीकडून पोलिसांवर हल्ला, गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू, हल्लेखोराला संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com