LPG Price Change: महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! LPG सिलेंडर महागला; किती रुपयांनी वाढले दर? वाचा...

LPG Cylinder Latest Price: नवीन दर रविवार म्हणजेच 1 सप्टेंबर 2024 पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1,691.50 रुपये झाली आहे.
LPG Price Change: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला; किती रुपयांनी वाढले दर? वाचा...
LPG Gas Cylinders RatesSaam TV
Published On

LPG Price News: आज सप्टेंबर महिन्यातील पहिला दिवस. महिन्याच्या सुरुवातीलाच सामान्यांना महागाईचा शॉक बसला आहे. देशात आजपासून गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढले आहेत. तेल वितरण कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ३९ रुपयांनी वाढवल्या आहेत. नवीन दर रविवार म्हणजेच 1 सप्टेंबर 2024 पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1,691.50 रुपये झाली आहे.

LPG Price Change: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला; किती रुपयांनी वाढले दर? वाचा...
Maharashtra Politics : वाचाळवीरांमुळे CM एकनाथ शिंदे अडचणीत; वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करणार का?

ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे, पण घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1,691.50 रुपये झाली आहे. सध्या राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 803 रुपये आहे, तर कोलकातामध्ये 14 किलोचा सिलेंडर 829 रुपयांना विकला जात आहे. मुंबईत एलपीजीची किंमत 802.5 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडर 918.5 रुपयांना विकला जात आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 39 रुपयांनी वाढ झाल्यानंतर दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1,691.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1802.5 रुपये झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर मुंबईत 1644 रुपये आणि चेन्नईमध्ये 1855 रुपयांना मिळणार आहे. पाटण्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1947 रुपये आहे, तर जयपूरमध्ये 19 किलोचा सिलेंडर 1719 रुपयांना विकला जात आहे.

LPG Price Change: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला; किती रुपयांनी वाढले दर? वाचा...
Wardha News: हृदयद्रावक! मुसळधार पावसाने पूल खचला, आजोबा अन् नात वाहून गेले; वर्ध्यातील घटना

पेट्रोल, डिझेलचे दर जैसे थे!

दरम्यान, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत पेट्रोल 94.72 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे, तर डिझेलचा दर 87.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 103.44 रुपये तर डिझेलचा दर 89.97 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.75 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.34 रुपये प्रति लिटर आहे. त्याचवेळी, कोलकातामध्ये पेट्रोल 104.95 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

LPG Price Change: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला; किती रुपयांनी वाढले दर? वाचा...
Mumbai Crime : भयंकर! ७ जणांची हत्या, दोघांचा मृतदेह नाल्यात फेकला; आरोपीच्या दाव्याने पोलिसांची उडाली झोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com