Eknath Shinde News: नवीन संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्यांवर CM शिंदेंचा हल्लाबोल; म्हणाले...

संसदेचा उद्घाटन सोहळा आणि नीती आयोगाच्या बैठकीला विरोध करणााऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
eknath shinde news
eknath shinde news saam tv

New Delhi: देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. याचबरोबर राजकीय पक्षांनी नीती आयोगाच्या बैठकीला देखील विरोध केला आहे. संसदेचा उद्घाटन सोहळा आणि नीती आयोगाच्या बैठकीला विरोध करणााऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. यावरून शिंदे यांनी विरोधकांवर कडाडून टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'केंद्राकडून आम्हाला सहकार्य मिळत आहे. त्यामुळे आम्ही राज्याला पुढे घेऊन जाऊ शकतोय. प्रत्येकाने काय करायचा त्याचा विचार करायचा असतो'.

eknath shinde news
Maharashtra Political Crisis: 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात प्रक्रियेला वेग; राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय!

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, 'संसद भवनाची इमारत वेळेत पूर्ण होत आहे. ही देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. संसद भवनातून आपण जनतेला न्याय देत असतो. कायदे करतो. या पवित्र मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला सर्वजण उपस्थित राहणे अपेक्षित असते'.

शिंदे पुढे म्हणाले, ' काही लोक विघ्नसंतोषी असून त्यांनी या कार्यक्रमाला विरोध करणं म्हणजे लोकशाहीचा विरोध आहे. विरोधकांना पोटदुखी सुटली आहे . सुज्ञ जनता ही पोटदुखी चांगला जमालगोटा देऊन दूर करेल. मराठीत एक म्हण आहे, नावडतीचं मीठं ही अळणी लागतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणंतही काम केलं तरी विरोधक त्याला विरोध करून वातावरण निर्मिती करतात, अशी शब्दात शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

eknath shinde news
Sanjay Raut On BJP: भाजपसोबत जाणाऱ्यांचं नुकसान होतं...; संजय राऊतांचं शिंदे सरकारला सुतोवाच

दरम्यान आजच्या नीती आयोगाच्या बैठकीवर देशातील काही मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला आहे. यामध्ये नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, भगवंत मान , तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि केसीआर या मुख्यमंत्र्यांचा सामावेश आहे. नीती आयोगाची बैठक दिल्लीत आज होणार आहे. या नीती आयोगाच्या बैठकीसाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशाचे राज्यपाल सहभागी होणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com