Sanjay Raut On BJP: भाजपसोबत जाणाऱ्यांचं नुकसान होतं...; संजय राऊतांचं शिंदे सरकारला सुतोवाच

आतापर्यंत जे कोणी त्यांच्याबरोबर गेले त्यांना त्यांनी खाऊन टाकलं आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut Saam Tv

Sanjay Raut News: भारतीय जनता पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सावत्रपणाची वागणुक दिली. त्यामुळे शिवसेना भाजपामधून वेगळी झाली, असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच भाजपसोबत जाणाऱ्यांचं नुकसान होतं, भाजप हा अजगर किंवा मगर आहे, आतापर्यंत जे कोणी त्यांच्याबरोबर गेले त्यांना त्यांनी खाऊन टाकलं आहे. शिंदे गटातील नेत्यांना देखील हे सर्वकाही लवकरच कळेल, असं भाकीतही राऊत यांनी वर्तवलं आहे.

झालेल्या गटाचे दोन गट

शिंदे गटात सध्या अस्वस्थता आणि नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील शिंदे गटातून आणखी दोन गट पडलेत, असं संजय राऊत म्हणाले. तसेच शिवसेना भाजपपासून वेगळी का झाली याविषयी सांगताना ते म्हणाले की, भाजपने त्यावेळी शिवसेनेच्या अनेक आमदारांना निधी मिळवून दिले नाहीत. त्यांची कामे रखडवून ठेवण्यात आली होती. क्रेंद्रापासून महाराष्ट्रापर्यंत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. तसेच सत्तेत भागीदारीचा वाटा असूनही त्यांनी योग्य मान दिला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला, असं कारण संजय राऊतांनी यावेळी सांगितलं आहे.

Sanjay Raut
Political News : लोकसभेसाठी अनेक जागांची अदलाबदल होण्याची शक्यता; श्रीकांत शिंदेंना देखील हक्काचा मतदारसंघ सोडावा लागणार?

देवेंद्र फडणवीसांवर काय काय जबाबदाऱ्या टाकल्यात हे पहावं लागेल...

पत्रकारांशी संवाद साधताना राऊतांनी फडणवीसांवर मिश्कील टिपण्णी केली आहे. यावेळी राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांत्याकडे कोणती जबाबदारी सोपवली आहे माहिती नाही. आधी ते उत्तम विरोधी पक्ष नेता होते. नंतर ते मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री झाले आहेत.

तर काल ते तुटलेल्या गटाच्या मुख्यमंत्र्याची गाडी चालवत होते. त्यामुळे केंद्राने त्यांच्यावर कायकाय जबाबदाऱ्या टाकल्या आहेत ते पहावं लागले. फडणवीस फार चांगले आहेत. मात्र मला त्यांची दया येते किव येते. इश्वराने त्यांना लवकरात लवकर या संकटातून सोडवावं, असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Satara Crime News: धक्कादायक! डॉक्टरांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मृतदेह घेऊन नातेवाईक पोलीस ठाण्यात

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com