China Covid updates : राष्ट्रपती जिनपिंग यांनी सोडलं चीनच्या कोरोना उद्रेकावर मौन; म्हणाले,'लोकांचे प्राण...'

चीनच्या या कोरोना उद्रेकावर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पहिल्यांदा मौन सोडलं आहे
xi jinping
xi jinping saam tv
Published On

China corona update : चीनमध्ये झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चीनचं 'शून्य कोरोना' धोरण हटविल्यानंतर रुग्ण वाढताना दिसत आहे. चीनमध्ये पुढील काही महिन्यात १० लाख लोकांचा कोरोनाने मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीनच्या या कोरोना उद्रेकावर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पहिल्यांदा मौन सोडलं आहे. 'चीन सरकार हे चीनी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी ठोस पावले उचलेल, अशी माहिती शी जिनपिंग यांनी दिली. (Latest Marathi News)

xi jinping
Covid in China: ओमिक्रॉनपेक्षा भयानक व्हेरिएंटचा धोका, वैज्ञानिकांच्या इशाऱ्याने चिंता वाढली

शी जिनपिंग म्हणाले की, 'लोकांचे प्राण वाचविण्यासाठी पावले उचलण्यात येतील. कोरोनाचा (Corona) सामना करण्यासाठी एक आरोग्य शिबीर सुरू करण्याची गरज आहे. कोरोनापासून सुरक्षा आणि कोरोनासाथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी समुदायाची रचना भक्कम करावी लागेल जेणेकरून लोकांचे प्राण वाचवू शकू'.

चीनी सरकारने कोरोनाच्या उद्रेकामुळे कडक प्रतिबंध लागू केले होते. मात्र, प्रतिबंध असूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. चीनमध्ये कोरोनामुळे १० लाख लोकांचा मृत्यूची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच देशात औषधांची कमतरता भासत आहे. देशातली आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. चीनमध्ये वृद्धांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले नसल्याचेही वृत्त समोर आले आहे.

जिनपिंग पुढे म्हणाले, 'चीनमध्ये कोरोनाची स्थिती बदलली आहे. आता चीनमध्ये एक आरोग्य शिबीर सुरू केले पाहिजे. कोरोना संकटातून सुटका करण्यासाठी कम्युनिटी स्ट्रक्चर तयार करावे लागेल. जेणेकरून अनेकांचा प्राण वाचू शकतात'.

xi jinping
Corona Alert : चीनसह अन्य देशात कोरोनाचा उद्रेक; मुंबई महापालिका प्रशासन सज्ज, केल्या 'या' उपाययोजना

चीन कोविडचा डाटा जाहीर करणार नाही

चीनमधील रुग्णालयातील रुग्णांच्या मृतदेहांची संख्या स्मशानगृहात वाढत चालली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने कोरोना रुग्ण आणि मृतांचे आकडे जाहीर करणार नाही असे जाहीर केले आहे.

चीनने स्वीकार केला आहे की, मोठ्या संख्येने कोरोना तपासणी केल्यानंतर आता कोरोनाचा प्रकोप नियत्रंणात आणणे हाताबाहेर आहे.

चीनमध्ये पुढील महिन्यात लाखो लोक नववर्षानिमित्त घरी येतील. त्यामुळे चीनमध्ये कोरोनाचा स्फोट होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com