Covid in China: ओमिक्रॉनपेक्षा भयानक व्हेरिएंटचा धोका, वैज्ञानिकांच्या इशाऱ्याने चिंता वाढली

चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे इतर देशांचीही चिंता वाढली आहे.
Corona
Coronasaam tv

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, BF.7 प्रकार चीनमध्ये कहर करत आहे. ज्यामुळे दररोज लाखो कोरोना केसेसची नोंद होत आहे. चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे इतर देशांचीही चिंता वाढली आहे. (Corona Latest News)

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे इन्फेक्शन डिसीज् एक्सपर्ट डॉ. स्टुअर्ट कॅम्पबेल रे यांनी ब्लूमबर्गमध्ये म्हटलं की, कोरोनाचे नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन व्हेरियंटसारखे असू शकतात. हे स्ट्रेनचे कॉम्बिनेशन असू शकते किंवा ते पूर्णपणे वेगळे असू शकते. चीनची लोकसंख्या खूप जास्त आहे. तर खूप कमी लोकांमध्ये कोरोना विरुद्ध प्रतिकारशक्ती आहे. या वातावरणात नवीन व्हेरिएंट निर्माण होण्याची भीती जास्त असते. (Latest Marathi News)

Corona
Covid 19 Alert: सर्व राज्यांना अॅलर्ट; सरकारनं उचललं 'हे' मोठं पाऊल; मास्क, सोशल डिस्टन्सिंग...

डॉ. स्टुअर्ट पुढे म्हणाले की, प्रत्येक नवीन संसर्ग कोविडला म्युटेशन करण्याची नवीन संधी देतो. जर चीनची लोकसंख्या 1.4 अब्ज असेल तर तेथे कोविड वेगाने पसरू शकतो. कारण तेथे 'झिरो-कोविड' धोरण जवळपास संपले आहे. चीनमधील लोकांमध्ये प्रतिकारशक्तीही कमी झाली आहे, त्यामुळे या विषाणूचे म्युटेट होण्यास मदत होऊ शकते.

जेव्हा-जेव्हा कोरोना संसर्गाच्या धोकादायक लाटा आल्या आहेत, तेव्हा आपण नवीन व्हेरिएंट जन्माला आल्याचे पाहिले आहे. डॉ. स्टुअर्ट पुढे म्हणाले, जगाच्या अनेक भागांमध्ये गेल्या सहा ते 12 महिन्यांत कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोरोना संसर्गाचा परिणाम एकतर लसीकरणामुळे किंवा संसर्गाविरूद्ध मजबूत प्रतिकारशक्तीमुळे झाला आहे, विषाणू कमी झाल्यामुळे नाही.

Corona
Lucknow: धक्कादायक! आईने मोबाईल काढून घेतला; ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

कोलंबसमधील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये व्हायरसचा अभ्यास करणारे डॉ. शान-लू लिऊ म्हणाले की, अलीकडे चीनमध्ये अनेक ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळले आहेत, ज्यात BF.7 चा देखील समावेश आहे.

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या कोरोना संसर्गाच्या वाढीदरम्यान, आरोग्य तज्ञ चीनमध्ये सुमारे 10 कोटी लोकांना कोविडची लागण होईल आणि आणि 10 लाख लोकांच्या मृत्यूची भीती व्यक्त करत आहेत. चीन अजूनही त्याच स्थितीत आहे ज्या स्थितीत भारत पूर्वी होता पण भारत आता व्हायरसशी लढण्यासाठी मजबूत स्थितीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com