Corona Alert : चीनसह अन्य देशात कोरोनाचा उद्रेक; मुंबई महापालिका प्रशासन सज्ज, केल्या 'या' उपाययोजना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका देखील सज्ज झाली आहे.
mumbai News
mumbai News Saam Tv
Published On

रुपाली बडवे

Corona Mumbai Update : चीन, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि फ्रान्स आदी देशांमध्ये कोविड-१९ च्या रुग्ण संख्येत अचानक वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २० आणि २२ डिसेंबर या दिवशी अद्ययावत सूचना प्रसारित केल्या. त्यानंतर आता मुंबई महापालिका देखील सज्ज झाली आहे. (Latest Marathi News)

mumbai News
Corona Update: कोरोना येण्याच्या भीतीने नागरिकांना 'लसी'ची आठवण; मात्र या 'लसीं'चा साठा संपला

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. याचे उद्दिष्ट कोविड रुग्णसंख्येत वाढ झाल्यास रुग्णालयांची पूर्वतयारी आहे का, याबाबत तपासणी करणे आहे.

कोविड-१९ ची रुग्णसंख्या वाढत असेल तर कोविड-१९ च्या उपचारांच्या दृष्टीने खालील पायाभूत सुविधांनी पुरविणार आहे. मुंबई महापालिकेने (BMC) कोविडचा उद्रेक झाल्यास रुग्णालयांची तयारी तपासण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने कोणत्या पायाभूत सुविधांची सोय केली आहे?

1) कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटांची उपलब्धता तपासणे.

2) महानगरपालिकेचे १०, शासकीय ३ व २१ खासगी रुग्णालय कार्यरत असून त्यांची खाटांची उपलब्धता खालील प्रमाणे आहे.

3) विलगीकरण खाटा - २१२४ (१५२३ कार्यशील)

4) ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा १६१३ (१०२१ कार्यशील)

5) अतिदक्षता विभागातील खाटा ५७९ (४७३ कार्यशील)

6) व्हेंटिलेटर - १०४९ (९५४ कार्यशील)

7) पुरेसे मनुष्यबळ असल्याची खातरजमा

8) डॉक्टर - ३२४५ (२८२८ कोविड-१९ चे व्यवस्थापन करण्यात प्रशिक्षित असलेले)

9)परिचारिका - ५७८४ (४०२९ कोविड-१९ चे व्यवस्थापन करण्यात प्रशिक्षित असलेले)

10) निमवैद्यकीय कर्मचारी- ३४५३ (३२४६ कोविड-१९ चे व्यवस्थापन करण्यात प्रशिक्षित असलेले)

11) रुग्णांची वाहतूक करण्यासाठी पुरेश्या रुग्णवाहिकांची व्यवस्था करणे

12) BLS रुग्णवाहिका - ४६ (३५ कार्यशील)

13) ALS रुग्णवाहिका - २५ (२५ कार्यशील)

14) सार्वजनिक खाजगी भागीदारी असलेल्या/ गैर शासकीय संस्थांमार्फत पुरविण्यात आलेल्या रुग्णवाहिका - २१ (१८ कार्यशील)

15) १०८ रुग्णवाहिका - ९६

16) कोविड-१९ रुग्णांचे निदान आणि मागोवा घेण्यासाठी चाचणी क्षमता सुनिश्चित करणे

17) दैनिक चाचणी क्षमता १३५०३५ आहे (३४ रुग्णालये, ४९ प्रयोगशाळा)

18) कोविड-१९ साठी विशिष्ट औषधे आणि उपचार प्रोटोकॉलची उपलब्धता सुनिश्चित करणे

19) रेमडीसीवीर, टॉसीलोझुम्याब, मिथाईलप्रेडनिसोलोन , डेक्सामेथाझोन, अँफोटेरीसिन बी, पॉस्कोनयाझोल इत्यादींचा साठा उपलब्ध आहे. भविष्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास ती खरेदी केली जाईल आणि उपलब्ध करून दिली जाईल.

20) आवश्यक उपकरणे आणि संसाधनांचा पुरवठा

mumbai News
Corona Update: मास्कची सक्ती करायची की नाही; कसे ठरवते केंद्र सरकार? तज्ञ काय म्हणतात जाणून घ्या...

21) पुरेशा प्रमाणात पीपीई किट, एन-९५ मास्क, नेब्युलायझर, पल्स ऑक्सिमीटर उपलब्ध आहेत.

22) कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

23) ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर - ८५९ (८५९ कार्यात्मक)

24 ) ऑक्सिजन सिलेंडर - २३९९ (२०३६ मेट्रिक टन)

25) PSA प्लांट ७९ (१४६८ मेट्रिक टन)

26) लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजन २६८ मेट्रिक टन

27) सर्व २४ विभागातील २४ तास चालू असणाऱ्या वॉर रूम्स द्वारे कोविडच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याकरिता मदत केली जाईल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com