China Drilling Hole: पृथ्वीच्या पोटात ११ किलोमीटर खोल खड्डा; खळबळजनक कारण आलं समोर

Drilling a 11 Kilometer Hole: जगात आपण तांत्रिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या बलाढ्य व्हाव असं चीनला वाटतं आहे.
China Drilling Hole
China Drilling HoleSaam TV
Published On: 

China News: माऊंट एव्हरेस्टच्या उंचीपेक्षाही अधिक खोल असा खड्डा पृथ्वीवर पहायला मिळाला आहे. सध्या या खड्ड्याची जोरदार चर्चा रंगलीये. हा खड्डा कोणी आणि कशासाठी केला याची माहिती देखील समोर आली आहे. २०३० येण्याआधी चंद्रावर प्रथम आपलं पाऊल पडावं यासाठी चीनने हा खड्डा खणलाय. अशी माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

सिंकयांगमधील टकलामकान या वाळवंटात सुमारे ११ हजार किलोमीटर खड्डा खणण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.चीन सातत्याने काही ना काही नवीन शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे. जगात आपण तांत्रिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या बलाढ्य व्हाव असं चीनला वाटत आहे. त्या दृष्टीने चीनच्या उपाययोजना सुरु आहेत.

China Drilling Hole
Crime News: १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ नराधमांकडून आळीपाळीने अत्याचार; छत्रपती संभाजीनगर शहरातील संतापजनक घटना

कशासाठी खणलाय खड्डा?

काही दिवसांपूर्वीच चीनकडून ३ अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्पेसमध्ये पाठवण्यात आले होते. यासह आता तब्बल ११ हजार १०० मीटर खोल खड्डा खणण्यात आला आहे. या खड्ड्यामार्फत चीनला प्राचीन क्रेटासियस गाठायचे आहे. म्हणजेच चीनला १४५ ते ६६ दशलक्ष वर्षांदरम्यानचा कालखंड गाठायचा आहे. खड्डा संपूर्ण खोदण्यासाठी ४५७ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

खड्डा खणण्याचा आणखीन एक हेतू म्हणजे तेल आणि वायूसाठे शोधणे हा आहे. टेकलामकान वाळवंटात नऊ किमी खोलीवर एक तेल विहिर देखील आहे. येथे तेल आणि नैसर्गिक वायूचे मोठे भांडार असण्याची शक्यता आहे.चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन ही चीनची (China) तेल वायू शोधणारी सर्वात मोठी कंपनी आहे. टकलामाकान वाळवंटातले थंडीतले तापमान २० अंश तर उन्हाळ्यातील तापमान ४० अंशांपर्यंत असते. त्यामुळे हे ध्येय साध्य करणे चीनसाठी खूप कठीण असेल.

China Drilling Hole
Hyderabad Crime: खळबळजनक! 30 वर्षीय तरुणीवर जडलं पुजाऱ्याचा जीव; आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर केलं भयानक कांड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.