Chile case : कंपनीची चूक अन् कर्मचारी मालामाल; अधिकचा पगार पाहून डोळे फिरले, रातोरात झाला फरार

Chile case : कंपनीच्या एका चुकीने एक कर्मचारी मालामाल झाला. बँक खात्यातील पगार पाहून या कर्मचाऱ्याचे डोळे फिरले. त्यानंतर हा कर्मचारी रातोरात फरार झाला.
कंपनीची चूक अन् कर्मचाऱ्याची झाली मजा; ३३० टक्के अधिक पगार मिळताच झाला फरार
SalarySaam Tv
Published On

चिली : काही वेळा कोणाची चूक झाली तर त्याचा फायदा इतरांना मिळतो. अशा वेळी दुसऱ्यांच्या चुकीचा फायदा झालेल्या व्यक्तीचा आनंद गगनात मावत नाही. असाच प्रकार चिलीमध्ये घडला आहे. एका कंपनीने एका कर्मचाऱ्याला चुकून महिन्याचा पगार 330 पट दिला. या कर्मचाऱ्याला कंपनीने महिन्याचा पगार ३३० पट अधिक दिला. अचानक जास्तीचा पगार खात्यात जमा होताच कर्मचारी फरार झालाय.

मीडिया रिपोर्टनुसार, पगाराच्या दिवशी त्याने मोबाईलवर बँक बॅलेन्सचा मेसेज पाहिला. त्यावेळी त्याला मिळणाऱ्या पगारात अधिकचा पगार आल्याचे समजले. त्याचा महिन्याचा पगार हा ५०००,००० पेसो (३४,०००रुपये) इतका आहे. मात्र, या कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात १६५,३९८,८५१ पेसो ( १,१३,००,००० रुपये) जमा झाले. कंपनीच्या चुकीने त्याच्या खात्यात अधिकचा पगार जमा झाला. बँक खात्यात अधिकचा पगार आल्याने कर्मचाऱ्याने त्याच्या वरिष्ठ सहकाऱ्याला कळवले. कंपनीनेही चूक झाल्याचे मान्य केले. त्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्याला अधिकचा पगार बँक जमा करण्यास सांगितला.

कंपनीची चूक अन् कर्मचाऱ्याची झाली मजा; ३३० टक्के अधिक पगार मिळताच झाला फरार
Viral Video : मावशींचा बिजनेस जोमात, पब्लिक कोमात! चक्क धावत्या ट्रेनमध्ये थाटलं ब्युटी पार्लर; VIDEO पाहून डोकं धराल

कर्मचाऱ्याने कंपनीला जास्तीचा पगार बँकेत जमा करण्याचं वचन दिलं. त्याने कंपनीला जास्तीच्या पगाराचे पैसे दुसऱ्या दिवशी कंपनीच्या बँक खात्यावर पुन्हा पाठवणार असल्याचे सांगितले. या कर्मचाऱ्याने कंपनीला दिलेला शब्द ऐनवेळी फिरवला. जास्तीचा पगार मिळालेला कर्मचारी रातोरात फरार झाला. कंपनीने त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कर्मचाऱ्याने वकिलाच्या मदतीने नोकरीचा राजीनामा दिला.

कंपनीची चूक अन् कर्मचाऱ्याची झाली मजा; ३३० टक्के अधिक पगार मिळताच झाला फरार
Viral Video : स्टंटबाजी करण पडलं तरूणांना महागात; धावत्या दुचाकीसह पडले तोंडावर ; पाहा VIDEO

कंपनीने या कर्मचाऱ्याकडील जास्तीच पगार पुन्हा मिळवण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. मात्र, चिली पोलीस अद्याप त्याला शोधू शकलेली नाही. जास्तीचा पगार मिळालेला कर्मचारी नेमका कुठे गायब झाला, असे कोडे पोलिसांसमोर आहे. या घटनेची चर्चा संपूर्ण चिली देशामध्ये पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com