Who is Sanjiv Khanna: धनंजय चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी ठरले! संजीव खन्ना होणार नवे सरन्यायाधीश? केंद्र सरकारकडे शिफारस

Sanjiv Khanna Next CJI Supreme Court: धनंजय चंद्रचूड यांच्यानंतर नवे सरन्यायाधीश कोण असणार? याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे. देशाचे पुढील मुख्य न्यायमूर्ती म्हणून सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
Who is Sanjiv Khanna: धनंजय चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी ठरले!  संजीव खन्ना होणार नवे सरन्यायाधीश? केंद्र सरकारकडे शिफारस
Sanjiv Khanna Next CJI Supreme Court: Saamtv
Published On

NEW Chief Justice of India: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे सेवानिवृत्त होणार आहेत. 10 नोव्हेंबर रोजी धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाल संपणार आहे. त्यानंतर आता देशाचे नवे सरन्यायाधीश कोण असणार? असा सवाल उपस्थित होत असतानाच आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. देशाचे पुढील मुख्य न्यायमूर्ती म्हणून सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

भारताचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) 10 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या पदावरून निवृत्त होणार आहेत. त्यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आणि 2 वर्षे या पदावर राहिले. धनंजय चंद्रचूड यांच्यानंतर नवे सरन्यायाधीश कोण असणार? याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे.

देशाचे पुढील मुख्य न्यायमूर्ती म्हणून सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. धनंजय चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टचे दुसरे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे. केंद्र सरकारने ही शिफारस मान्य केल्यास 11 नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश संजीव खन्ना असतील. संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 6 महिन्यांचा असेल ते १३ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त होतील.

Who is Sanjiv Khanna: धनंजय चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी ठरले!  संजीव खन्ना होणार नवे सरन्यायाधीश? केंद्र सरकारकडे शिफारस
Maharashtra Politics: काँग्रेसचं ठरलं! उमेदवारांची पहिली यादी 'या' तारखेला येणार; कोणाची लॉटरी लागणार?

कोण आहेत संजीव खन्ना?

न्यायमूर्ती संजीव खन्ना जानेवारी 2019 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात आले. त्यांच्या सुमारे साडेचार वर्षांच्या कार्यकाळात येथे अनेक महत्त्वाचे निर्णय देण्यात आले आहेत. संजीव खन्ना हे सुप्रीम कोर्टाच्या 358 खंडपीठांचे सदस्य आहेत आणि ९० महत्वपूर्ण निकाल दिलेत. त्यांनी दीर्घकाळ आयकर विभागात वरिष्ठ स्थायी वकील म्हणून काम केले आणि 2004 मध्ये त्यांची दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेशासाठी स्थायी वकील (सिव्हिल) म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील आणि ॲमिकस क्युरी म्हणून अनेक फौजदारी खटल्यांमध्ये हजेरी लावली आणि युक्तिवाद केला.

2005 मध्ये संजीव खन्ना यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि 2006 मध्ये त्यांना कायम न्यायाधीश बनवण्यात आले. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी दिल्ली अकादमी, दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र आणि जिल्हा न्यायालयाचे अध्यक्ष/प्रभारी पदही भूषवले आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना 18 जानेवारी 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनवण्यात आले.

न्यायाधीशांची नेमणूक कशी केली जाते?

भारतात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कॉलेजियम प्रणालीद्वारे केली जाते. भारताच्या सरन्यायाधीशांच्या व्यतिरिक्त, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये चार सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. त्यात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय न्यायाधीशांच्या बदल्यांवरही कॉलेजियम निर्णय घेते.

Who is Sanjiv Khanna: धनंजय चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी ठरले!  संजीव खन्ना होणार नवे सरन्यायाधीश? केंद्र सरकारकडे शिफारस
Crime News: बेधुंद नशेत असणाऱ्या तरुणाने मित्राला संपवले, छत्रपती संभाजीनगरमधील भयंकर घटना; धक्कादायक कारण समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com