अगदी सामान्य, रोज काम करुन पोट भरणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या बॅंक खात्यात अचानक कोट्यवधी रुपये आले तर काय गोंधळ उडेल ना? असाच चक्रावून टाकणारा प्रकार चेन्नईमधून समोर आला आहे. चेन्नईमध्ये एका मेडिकल दुकानात काम करणाऱ्या तरुणाच्या खात्यात अचानक ७५३ कोटी रुपये आले अन् एकच खळबळ उडाली. काय आहे हे प्रकरण, जाणून घेवूया.
याबाबत अधिक माहिती अशी की, करणकोविल येथील रहिवासी असलेले मुहम्मद इद्रिस हे तेनामापेठ येथील एका मेडिकल दुकानात काम करतात. 7 ऑक्टोबर रोजी त्यांनी त्यांच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातून 2000 रुपये पाठवले होते. यानंतर त्याने आपला बॅंक बॅलन्स चेक करण्यासाठी मोबाईल काढला अन् त्याच्या पायाखालची जमिनच सरकली.
कारण त्याच्या खात्यात 753 कोटी रुपये असल्याचे मेसेजमध्ये म्हटले होते. या संपूर्ण प्रकाराने हा तरुण चांगलाच गोंधळून गेला. त्याने थेट बॅंकेत जाऊन याबाबतची माहिती दिली. खात्यात इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याचे पाहताच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लगेचच ईदरीसचे बँक खाते फ्रीज केले गेले.
याबाबत बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक कारणामुळं चुकीच्या खात्यात रक्कम जमा झाली होती. त्यामुळं बँकेचे खाते फ्रीज करण्यात आले आहे. फक्त एसएमएसमध्येच चुकीची रक्कम दिसत आहे, बँक खात्यात नाही. ग्राहकाचे खाते बंद करण्यात आले नाहीये, आमची चूक सुधारण्याचे काम आम्ही करत आहोत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.